तरुण भारत

आडवली रवळनाथ मंदिराच्या फंडपेटीतील रक्कम अज्ञाताकडून लंपास

आचरा /प्रतिनिधी-

मालवण तालुक्यातील आडवली गावातील श्री देव रवळनाथ मंदिरातील अज्ञात चोरट्यांनी फंडपेटी फोडून आतील रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना 2 डिसेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत घडली. फंडपेटीतील सुमारे चार हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले आहेत. याबाबतची तक्रार आचरा पोलीस ठाण्यात भार्गव वामन लाड यांनी दिली असून सदर घटनेचा तपास आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील करत आहेत.

Advertisements


आडवली गावातील श्रीदेव रवळनाथ मंदिरात नुकताच धार्मिक कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात भावजकांनी मोठया प्रमाणात हजेरी लावल्याने फंडपेटीत रक्कम जमा झालेली होती. शुक्रवारी सकाळी मंदिरात गेलेले लाड यांना गाभाऱ्यात असलेली फंडपेटी फोडलेल्या अवस्थेत असलेली आढळून आली व त्यातील रक्कम नसल्याचे निदर्शनास आले या घटनेची माहिती त्यानी आचरा पोलिसांना दिली.

Related Stories

एका माध्यमाच्या ‘सिक्रेट’ शाळेतून विद्यार्थी पालकांवर दबाव

Patil_p

जन्मतःच्या दिव्यांगत्वावर मात करत ‘तेजस्’वी प्रवास…!

Patil_p

रत्नागिरीत सायंकाळनंतर जोर‘धार’

Patil_p

पहिल्या दिवशी केवळ 226 प्रवासी

NIKHIL_N

चौदा हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱयाला अटक

Patil_p

साटेली-भेडशी ग्रामपंचायत व्यापाऱयांवर नाराज

NIKHIL_N
error: Content is protected !!