तरुण भारत

“कोण राहुल गांधी ? मी ओळखत नाही”; असदुद्दीन ओवेसींचा काँग्रेसवर निशाणा

ऑनलाईन टीम/तरुण भारत

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल-मुस्लिमीन (एआयएमआयएम) नेते असदुद्दीन ओवेसी यांनी शुक्रवारी काँग्रेस आणि त्यांचे नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा एकाचवेळी अनेक राज्यांमध्ये विस्तार करण्याच्या प्रयत्नांचा संदर्भ देत ओवेसी म्हणाले, “त्यांनी इतर राज्यांमध्ये लढत रहावे, आणि काँग्रेससोबत राहिल्याने मी तुम्हाला सांगत आहे की काँग्रेस दोन तीन वर्षांमध्ये फुटेल.” असा निशाणा त्यांनी साधला.

दरम्यान, देशात आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक होणार आहेत. या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. यापैकी उत्तर प्रदेशमधील निवडणुकांकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी विरोधी पक्ष कामाला लागले आहेत. अशातच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. एका कार्यक्रमात बोलताना एमआयएम पक्षाचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यानी काँग्रेसवर जोरदार टीका केली. तसेच कोण आहेत राहुल गांधी मी त्यांना ओळखत नाही, असं म्हणत निशाणा साधला.

Advertisements

Related Stories

जम्मू काश्मीरमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 25,367 वर

Rohan_P

प्रजासत्ताकदिनी आसाममध्ये स्फोट

Abhijeet Shinde

अनिल देशमुखांच्या स्वीय सहाय्यकांना सीबीआयकडून चौकशीसाठी समन्स

Abhijeet Shinde

नियम पाळल्यास लॉकडाऊनची गरजच नाही !

Patil_p

ही केवळ अतिवृष्टी नाही तर अनपेक्षित संकट आहे – मुख्यमंत्री

Abhijeet Shinde

कोरोनाच्या ‘डेल्टाक्रॉन’ व्हेरिएंटचा शोध

datta jadhav
error: Content is protected !!