तरुण भारत

परिते येथे बसवर दगडफेक; एक प्रवासी जखमी

भोगावती / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राधानगरी एस टी आगारामधून तब्बल तीस दिवसानंतर बाहेर पडलेल्या बसवर दोन अज्ञातांनी मोटरसायकलवरुन येऊन परिते ता करवीर येथे शनिवारी दगडफेक केली. यामध्ये एक प्रवाशी जखमी झाला असून घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे.

परिवहन महामंडळाच्या कामगारांचे राज्यभर आंदोलन चालू असताना आज घडलेली घटना ही अत्यंत लक्षवेधी ठरली आहे.यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील एस.टी. कामगारांचे आंदोलन वेगळ्या वळणावर गेल्याचे स्पष्ट होते. याप्रकरणी घटनास्थळावरुन घेतलेली माहिती अशी की, राधानगरी एस टी आगाराची क्र एम एच ११- ७ – ९२९७ ही बस राधानगरीहून रंकाळा बस स्टँड कोल्हापूरकडे जात होती.
शनिवारी सायंकाळच्या सुमारास परिते गावातील बस थांब्यावर प्रवाशी घेऊन बस पुढे जात होती.

त्याचवेळी मोटरसायकल वरुन आलेल्या दोघा अज्ञातांनी बसच्या मागील काचेवर दगडफेक केली. यामध्ये काच फुटल्याने मागील बाजूच्या आसनावर बसलेले प्रवाशी अदिनाथ शिवाजी मगदुम (वय २४ ) रा.हळदी ता.करवीर जखमी झाले. शनिवारी तीस दिवसानंतर प्रथमच राधानगरी आगाराची एक बस बाहेर पडली होती. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे.

Advertisements

Related Stories

वेदगंगा नदीकाठच्या शेकडो विद्युत मोटारी पाण्यात बुडल्या

Abhijeet Shinde

सातवेतील ‘त्या’ तरुणाच्या मृत्यू प्रकरणी सपोनि दिनेश काशीद यांच्या निलंबनाची मागणी

Abhijeet Shinde

धक्कादायक : कळंबा कारागृहातील ३७ कैद्यांना कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

कोल्हापूर : मोटर सायकलची टेम्पोला समोरासमोर धडक ; एक ठार

Abhijeet Shinde

कोल्हापूर : रेशनवर मिळणार एक महिन्यासाठी मका

Abhijeet Shinde

हातकणंगले येथे मयूर बिअर बारवर छापा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!