तरुण भारत

अनिल कपूरने दिलं महागडं गिफ्ट

अनुपम खेर म्हणाले, बकवास मत करो!

बॉलिवुडमध्ये आपल्या कॉमेडी आणि हलक्याफुलक्या भुमिकांसह गंभीर अदाकारीसाठीही अनुपम खेर ओळखले जातात. त्यांनी केलेले एक ‘गंमतीशीर कू’ सध्या चर्चेचा विषय बनले आहे. सदाबहार अभिनेता अनिल कपूर त्यांना भेटायला गेला. त्याने जाताना गिफ्ट म्हणून खेर यांच्यासाठी एक चष्मा नेला. त्यांनी लगोलग तो डोळ्यांवर चढवला. ते पाहून अनिल कपूरने प्रतिक्रिया दिली, ‘इतका महागडा चष्मा शोभत नाहीय तुम्हाला, कुणाचा मागून घातलाय असं वाटतं आहे. यावर खेर एकदम रागावत बोलले, ‘क्या बकवास कर रहे हो? या संवादाचा व्हीडिओ खेर यांनी कू वर पोस्ट केला असून लोक त्यावर मजेदार कमेंट्सही करत आहेत. खेर यांनी व्हीडिओ पोस्ट करताना मिश्कील टिप्पणीही केली आहे. ते म्हणतात, माझा दोस्त अनिल कपूरने खास माझ्यासाठी लंडनहून डिझायनर चष्मा आणलाय. देव करो, असे दोस्त सगळ्यांना मिळो! धन्यवाद अनिलजी! व्हीडिओत अनिलने दिलेला चष्मा उतरवत पुन्हा आपला चष्मा घालताना खेर म्हणतात, ‘ये मेरा गरीब चष्मा, और ये रहा गिफ्ट मिला हुआ अमिर चष्मा!

Advertisements

Related Stories

फादर्स डेच्या निमित्ताने ‘जून’, ‘प्लॅनेट मराठी’कडून सर्व बाबांना अनोखी भेट

Patil_p

हनी सिंहला मेडिकल रिपोर्ट आणि आयटी रिटर्न सादर करण्याचे दिल्ली कोर्टाचे आदेश

Rohan_P

‘राहु-केतू’ला शरण कंगना रनौत

Patil_p

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शहीद भाई कोतवाल होणार प्रदर्शित

Patil_p

साऊथचा सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरला कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

विकी कौशल ‘द वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स’ मध्ये

Sumit Tambekar
error: Content is protected !!