तरुण भारत

नवजातांना चुकून देण्यात आली कोरोनाची लस

ब्राझीलमधील धक्कादायक प्रकार : दोन्ही नवजात रुग्णालयात दाखल

वृत्तसंस्था/ ब्राझिलिया

Advertisements

ब्राझीलमध्ये 2 नवजातांना चुकून कोरोनाची लस देण्यात आल्याचे प्रकरण समारे आले आहे. या नवजातांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 2 महिन्यांची एक मुलगी आणि 4 महिन्यांच्या मुलाला फायजरची लस देण्यात आली. या नवजातांना डिप्थीरिया, टिटेनस आणि हिपेटायटिस बीवरील लस देणे अपेक्षित होते. या नवजातांना कोरोनावरील लस देणाऱया नर्सला निलंबित करण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले.

दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनमुळे कोरोनाची चौथी लाट उद्भवली आहे. देशात ओमिक्रॉन व्हेरियंटचे संक्रमित वेगाने वाढत आहेत. याचमुळे रुग्णालयांन आामिक्रॉनच्या रुग्णांच्या उपचाराच्या दृष्टीने तयार केले जात आहे. राष्ट्रपती सिरिल रामफोसा यांनी लोकांना मोठय़ा संख्येत  लस घेण्याचे आवाहन केले आहे.

ब्रिटनमध्ये रुग्णवाढ

ब्रिटनमध्ये रविवारी ओमिक्रॉनचे 86 नवे रुग्ण सापडले आहेत. ब्रिटनमध्ये आता नव्या व्हेरियंटच्या बाधितांची संख्या 246 झाली आहे. ब्रिटनमध्ये दिवसभरात कोरोनाचे 43,992 नवे रुग्ण सापडले आहेत.

पुन्हा संसर्गाचा धोका अधिक

कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन व्हेरियंट हा डेल्टा आणि बीटाच्या तुलनेत अधिक संक्रमक असू शकतो. तसेच ओमिक्रॉनमुळे पुन्हा संसर्ग होण्याचा धोकाही अधिक असल्याचे सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. कोरोना संसर्गातून बरे झालेले लोक पुन्हा संक्रमित होऊ शकतात असे सांगण्यात आले.

अमेरिकेत लसीची मागणी वाढली

अमेरिकेच्या 16 प्रांतांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट फैलावला आहे. संक्रमणाचा वाढता धोका पाहता अमेरिकेत लसीचा पहिला अन् बुस्टर डोस घेणाऱया लोकांच्या संख्येत सुमारे 66 टक्क्यांची वृद्धी झाली आहे. अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोलनुसार मागील एक महिन्यात प्रतिदिन सुमारे 9 लाख लसींच्या मागणीच्या तुलनेत आता प्रतिदिन सुमारे 15 लाख लसींची मागणी होत आहे.

Related Stories

तालिबानची अमेरिकेला धमकी

datta jadhav

परदेशी पर्यटकांना कोरोना झाल्यास उज्बेकिस्तान देणार सव्वा दोन लाख रुपये

datta jadhav

चिली : रुग्णांमध्ये घट

Patil_p

युरोप : संकट वाढतेच

Patil_p

बेल्जियममध्ये संचारबंदी

Patil_p

कोलंबिया : विटंबनेनंतर कोलंबसचा पुतळा भांडारगृहात हलविला

datta jadhav
error: Content is protected !!