तरुण भारत

श्वानांशी बोलू शकणारी महिला

स्वतःच्या श्वानाला केले लेखक

प्राणीपेमींना प्राण्यांना अनेक गोष्टी समजाविताना पाहिले असेल, पण ते त्यांची भाषा समजू शकत नाहीत, केवळ हावभावावरून प्राण्यांचे मन जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. पण ब्रिटनमधील एका महिलेने आपण श्वानांची बोली समजू शकतो असा दावा केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे महिलेने आता स्वतःच्या श्वानाला लेखक केले आहे.

Advertisements

नॉर्थ वेल्स येथे राहणाऱया 80 वर्षीय सिल्विया इवान्स यांच्या दाव्यामुळे सर्वच जण चकित झाले आहेत. श्वानांशी आपण बोलू शकते असे सिल्विया यांनी म्हटले आहे. श्वानासोबत त्यांच्याच भाषेत बोलते. माझ्याकडे 3 वर्षांचा चिहुआहुआ आणि जॅक रसेल ब्रीडचा क्रॉस श्वान असल्याचे त्यांनी सांगितले.

माझ्या श्वानाने आपण पुस्तक लिहू इच्छितो असे सांगितले होते असा दावा सिल्विया यांनी केला. सिल्विया या निवृत्त महिला आहेत. माझ्या श्वानाने पुस्तक लिहिल्याचे मी जेव्हा इतरांना सांगते, तेव्हा ते मला वेडी समजू लागतात असे सिल्विया यांनी म्हटले आहे.

श्वानाने स्वतःच्या भाषेत पुस्तक डिक्टेटक केले आणि मी ते इंग्रजीत लिहिल्याचे महिलेने सांगितले. ईवान्स या कलाकार देखील असल्याने त्यांनी स्वतःच पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे डिझाइन केले होते. पतीच्या मृत्यूनंतर श्वानच माझ्या जीवनाचा महत्त्वाचा हिस्सा ठरल्याचे त्या सांगतात.

Related Stories

बाबुल सुप्रियो तृणमूलमध्ये दाखल

datta jadhav

2047 पर्यंत भारतही ‘अर्थ’संपन्न – अंबानी

Patil_p

बारा केंद्रीय विद्यापीठांच्या उपकुलगुरुंची नियुक्ती

Amit Kulkarni

ममतांच्या ‘भवानीपूर’मध्ये 30 रोजी पोटनिवडणूक

Patil_p

पंजाबमध्ये विजेचे संकट गडद

Amit Kulkarni

पाटणामधील मीठापूर भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन

Rohan_P
error: Content is protected !!