तरुण भारत

बर्फाचे बुडबुडे अन् सर्वात खोल सरोवर

मिथेन गॅसचे बुडबुडे देखील गोठले

युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत सामील रशियातील बैकाल सरोवर जगातील सर्वात खोल आणि सर्वात मोठे ताज्या पाण्याचे सरोवर आहे. बैकाल सरोवरात जगातील सुमारे 20 टक्के साफ पाण्याचा साठा आहे. सध्या तेथील तापमान शून्याहून कमी आहे. रविवारी तेथील तापमान उणे 4 अंश सेल्सिअस नोंदले गेले होते.

Advertisements

पारा खालावल्याने या सरोवरावर दोन मीटर रुंदीचा बर्फाचा थर जमा झाला आहे. बैकाल सरोवर गोठल्यावर येथे एक अद्भूत दृश्य दिसून येते. सरोवरात ग्रीन हाउस इफेक्टसाठी जबाबदारी मिथेन वायू देखील आहे. सरोवरातील पाणी गोठल्यावर मिथेन वायुचे बुडबुडे देखील गोठतात.

नासानुसार एवढय़ा प्रमाणात मिथेन वायू पृथ्वीच्या वातावरणात मिसळल्यास पृथ्वीच्या सरासरी तापमानात मोठी वाढ होणार आहे. पण बैकाल सरोवरातील नैसर्गिक व्यवस्थेमुळे सरोवर गोठताच येथील पाणी मिथेन वायूला वातावरणात मिसळू देत नाही. बैकाल सरोवराचे हे अनोखे कार्य पृथ्वीला सुरक्षित ठेवण्यास विशेष भूमिका बजावत आहे.

Related Stories

पाकिस्तानात अवैध शस्त्रास्त्रांची मोठी बाजारपेठ

Patil_p

हिंदू व्यावसायिकाची पाकिस्तानमध्ये हत्या

Patil_p

मेक्सिकोत कोरोना रुग्णांचीमृत्युसंख्या 3 लाखावर पोहचणार?

Patil_p

इम्रान खान यांनी 31 जानेवारीपर्यंत सत्ता सोडावी; अन्यथा…

datta jadhav

कोरोना रुग्णसंख्येत ब्राझील जगात दुसऱ्या स्थानी

datta jadhav

अमेरिकन सैन्याने देश सोडताच तालिबानचा जल्लोष

datta jadhav
error: Content is protected !!