तरुण भारत

प्रीपेड पाठोपाठ पोस्टपेड शुल्क वाढणार

वृत्तसंस्था/ मुंबई

दूरसंचार कंपन्यांनी यापूर्वी प्रीपेड शुल्कात वाढ केली असून आता पोस्टपेड शुल्क वाढवण्यात येणार असल्याची माहिती आहे. येत्या काळात पोस्टपेड ग्राहकांनाही 20 ते 25 टक्के अधिकची रक्कम महिन्याकाठी द्यावी लागणार आहे. भारती एअरटेल, व्होडाफोन, आयडिया यांच्याकडून लवकरच शुल्क वाढ केली जाणार आहे. यापूर्वी जुलैमध्ये एअरटेलने पोस्टपेड ग्राहकांच्या शुल्कात वाढ केली होती.

Advertisements

जाणकारांच्या मते दूरसंचार कंपन्या पोस्टपेड शुल्कात वाढ करण्यास जेवढा उशीर करतील तेवढे नुकसान कंपन्यांचे वाढणार आहे. तेव्हा येणाऱया काही दिवसातच ही वाढ केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

भारतातच स्वस्त प्लान

अलीकडे प्रीपेड शुल्कात वाढ झाली असली तरी जगातील देशांच्या तुलनेत आपल्याकडच्या कंपन्यांचे शुल्कांचे प्लान हे स्वस्त आहेत. भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया व रिलायन्स जियो यांची बाजारातील वाटा घेण्यासाठी लगबग वाढलेली दिसणार आहे.

Related Stories

सिटी बँकेने वेदांताचे समभाग विकले

Patil_p

सेन्सेक्समध्ये घसरण -निफ्टी स्थिर

Patil_p

टेस्लाचे एलॉन मस्क बनले जगातील धनाढय़

Patil_p

पोस्टाच्या सर्व बचत योजना ग्रामीण भागात होणार उपलब्ध

Patil_p

कोरोनामुळे मार्चमध्ये पेट्रोल-डिझेलच्या मागणीत घट

Patil_p

रिलायन्समधील हिस्सेदारी घेण्याबाबत अराम्को उत्सुक

Patil_p
error: Content is protected !!