तरुण भारत

सैन्यात अधिकाऱ्यांची 7,476 पदे रिक्त

केंद्र सरकारने दिली माहिती – नौदल अन् वायुदलातही अधिकाऱयांची कमतरता

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

सैन्यात अधिकाऱयांची 7,476 पदे रिक्त असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी सोमवारी संसदेत दिली आहे. नौदलात अधिकाऱयांची 1,265 आणि वायुदलात 621 पदे रिक्त असल्याचे भट्ट यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखीत उत्तरादाखल सांगितले आहे.

सैन्याच्या कुठल्या रेजिमेंटमध्ये सर्वाधिक रिक्त पदे आहेत असाही प्रश्न विचारण्यात आला होता. सरकारने रिक्त पदे भरण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. या उपाययोजनांमध्ये करियर मेळावे, प्रदर्शनांमध्ये भागीदारी आणि सशस्त्र दलांमधील आव्हानात्मक आणि समाधानकारक कारकीर्दीविषयी तरुणाईमध्ये जागरुकता निर्माण करणे सामील असल्याचे मंत्री भट्ट यांनी म्हटले.

मागील 5 वर्षांमध्ये 286 एकर संरक्षण भूमीवर अतिक्रमण करण्यात आले आहे.  देशभरातीत छावणी परिषदांच्या सर्व मालमत्तांचे जियो टॅगिंग करण्यात आले असून त्यांना भूमी व्यवस्थापन प्रणालीशी जोडण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली.

संरक्षण उद्योग क्षेत्राला भारतीय खासगी भागीदारीसाठी 100 टक्के खुले करण्यात आल्यावर सरकारने आतापर्यंत 342 कंपन्यांना एकूण 556 संरक्षण औद्योगिक परवाने प्रदान केले आहेत. संरक्षण क्षेत्रात प्रदान करण्यात आलेल्या 556 संरक्षण औद्योगिक परवान्यांपैकी 66 उत्तर प्रदेशात कार्यरत कंपन्यांना देण्यात आल्याचे भट्ट यांनी सांगितले.

Related Stories

प्रक्षोभक भाषणप्रकरणी यती नरसिंहानंद अटकेत

Patil_p

केंद्रीय स्तरावर कोरोना लसीची खरेदी

datta jadhav

रानडुकरांना मारू देण्याची केरळची मागणी फेटाळली

Patil_p

पंतप्रधान मोदी व नथुराम गोडसे यांची विचारधारा एकच : राहुल गांधी

prashant_c

छत्तीसगडमध्ये 12 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Patil_p

उपलब्ध ऑक्सिजन अत्याधिक आवश्यक वस्तू म्हणून वापरा

Patil_p
error: Content is protected !!