तरुण भारत

काशी विश्वनाथ मंदिरात होणार कॅबिनेट बैठक

वृत्तसंस्था/ वाराणसी

एखाद्या मंदिरात मंत्रिमंडळाची बैठक होण्याचा प्रकार पहिल्यांदाच उत्तरप्रदेशात घडणार आहे. राज्यातील योगी आदित्यनाथ सरकारच्या कॅबिनेटची बैठक 16 डिसेंबर रोजी काशी विश्वनाथ मंदिरात होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री पेशवप्रसाद मौर्य आणि डॉ. दिनेश शर्मा यांच्यासाब्sात अन्य मंत्री तसेच अधिकीर सामील होतील. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा यश मिळवू पाहणाऱया भाजपचा हा मास्टरस्ट्रोक असल्याचे मानले जातेय. लखनौनंतर वाराणसी राज्याची दुसरी राजधानी असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न सरकारने याद्वारे केला आहे.

Advertisements

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर’चा शुभारंभ लवकरच होणार आहे. पंतप्रधानच या प्रकल्पाचे लोकार्पण करतील. हा कार्यक्रम देशभरातील लोकांपर्यंत पोहोचविण्याची तयारी भाजपने केली आहे. तर राज्याच्या निवडणुकीपूर्वी पूर्वांचलात प्रभाव निर्माण करण्यासाठी योगी सरकार काशी विश्वनाथ धाममध्ये कॅबिनेट बैठक घेत एका मोठा संदेश देऊ इच्छित आहे.

14 डिसेंबर रोजी भाजपशासित राज्यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काशी विश्वनाथ धाममध्ये बैठक घेतील. विश्वनाथच्या या नव्या काशीद्वारे सामाजिक समरसता, सार्वभौमत्व आणि एकतेचा संदेश देतील. 13-14 डिसेंबर रोजीचा पंतप्रधानांच दौरा पूर्ण झाल्यावर 16 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.

Related Stories

खर्च कमी करण्यासाठी पंजाब सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Rohan_P

अमित शहा-ममता बॅनर्जी एकाच पंगतीत

tarunbharat

आणखी एका आमदाराने सोडली TMC ची साथ

datta jadhav

भारताने विकसित केली सर्वोत्तम हॉवित्झर तोफ

Patil_p

बुद्धदेव भट्टाचार्य यांची प्रकृती बिघडली

Patil_p

नव्या रुग्णांमध्ये केरळचेच 51 टक्के

Amit Kulkarni
error: Content is protected !!