तरुण भारत

गॅले ग्लॅडिएटर्सची विजयी सलामी

वृत्तसंस्था / कोलंबो

रविवारपासून येथे सुरू झालेल्या श्रीलंका प्रिमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत कर्णधार राजपक्षेच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर ग्लॅडिएटर्सने जाफना किंग्जचा 54 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली.

Advertisements

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गॅले ग्लॅडिएटर्सने 20 षटकांत 7 बाद 164 धावा जमविल्या. त्यानंतर जाफना किंग्जचा डाव 18.2 षटकांत 110 धावांत आटोपला. लंकेमध्ये दुसऱयांदा ही लीग भरविली जात आहे. गॅले ग्लॅडिएटर्सच्या डावात कर्णधार भानुका राजपक्षेने 31 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह 56 धावा झळकविल्या. राजपक्षेने डंकसमवेत चौथ्या गडय़ासाठी 52 धावांची भागिदारी केली. डंकने 17 धावा जमविल्या. त्यानंतर जाफना किंग्जच्या डावात वहाब रियाजने 27 धावा जमविल्या. गॅले ग्लॅडिएटर्सतर्फे समीत पटेलने 21 धावांत 3 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

गॅले ग्लॅडिएटर्स 20 षटकांत 7 बाद 164 (राजपक्षे 56, डंक 17), जाफना किंग्ज 18.2 षटकांत सर्वबाद 110 (वहाब रियाज 27, समीत पटेल 3-21).

Related Stories

बांगलादेशचा विंडीजवर वनडे मालिका विजय

Patil_p

अर्जेंटिना संघाची विजयी सलामी

Patil_p

ऑलिम्पिकमध्ये टी-10 क्रिकेट असावे : ख्रिस गेल

Patil_p

हिमा दासला पहिला डोस

Patil_p

दिल्ली कॅपिटल्स-पंजाबच्या पॉवरहिटर्सची आज जुगलबंदी

Patil_p

आघाडीच्या स्थानासाठी आज चेन्नई-दिल्ली लढत

Patil_p
error: Content is protected !!