तरुण भारत

डेव्हिस चषक : क्रोएशियाला हरवून रशिया विजेते

वृत्तसंस्था / माद्रीद

येथे सुरू असलेल्या डेव्हिस चषक फायनल्सच्या अंतिम लढतीत रशियाने आपले दोन्ही एकेरीचे सामने जिंकून क्रोएशियावर 2-0 अशी निर्विवाद आघाडी घेत जेतेपद पटकावले. रशियाच्या मेदव्हेदेव आणि रूबलेव्ह यांनी आपले एकेरीचे सामने रविवारी जिंकले.

Advertisements

या अंतिम लढतीतील पहिल्या एकेरी सामन्यात रशियाच्या आंद्रे रूबलेव्हने क्रोएशियाच्या गोजोचा 6-4, 7-6 (7-5) असा पराभव करत आपल्या संघाचे खाते उघडले. पाचव्या मानांकित रूबलेव्हचा हा या स्पर्धेतील सलग तिसरा विजय आहे. या स्पर्धेच्या प्राथमिक गटातील झालेल्या लढतीत रूबलेव्हला स्पेनच्या लोपेझकडून पराभव पत्करावा लागला होता. 2021 च्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत उपांत्य लढतीत क्रोएशियाने बलाढय़ सर्बियाचा तर रशियाने जर्मनीचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. रशियाला डेव्हिस चषकावर तिसऱयांदा आपले नांव कोरण्यासाठी तब्बल 15 वर्षांच्या कालावधीची वाट पाहावी लागली. रशियाने यापूर्वी 2006 व त्याआधी 2002 मध्ये डेव्हिस चषक स्पर्धा जिंकली होती.

या अंतिम लढतीतील दुसऱया एकेरी सामन्यात रशियाच्या डॅनिल मेदव्हेदेवने क्रोएशियाच्या मारीन सिलीकचा 7-6 (9-7), 6-2 असा पराभव करत आपल्या संघाला 2-0 अशी विजयी आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर दुहेरीचा सामना बिनमहत्त्वाचा असल्याने तो खेळविण्यात आला नाही. डेव्हिस चषक स्पर्धेतील मेदव्हेदेवचा पाचवा सरळ सेटस्मधील विजयी सामना आहे. तीन महिन्यापूर्वी झालेल्या अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत मेदव्हेदेवने सर्बियाच्या टॉप सीडेड जोकोविचचा पराभव करून आपले पहिले ग्रॅण्डस्लॅम जेतेपद पटकाविले होते. क्रोएशियाने डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या इतिहासात 2005 आणि 2018 साली  अजिंक्यपद पटकाविले होते.

गेल्या महिन्यात प्राग्वे येथे झालेल्या महिलांच्या सांघिक  बिली जिन किंग चषक टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद रशियाने पटकाविले होते. 2019 साली माद्रीद शहरामध्ये डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा सात दिवस घेण्यात आली होती. 2021 साली ऑस्ट्रीया तसेच इटलीतील टय़ुरिनमध्ये सदर स्पर्धा 11 दिवस घेण्यात आली. कोरोना महामारी समस्येमुळे 2020 साली डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा रद्द करण्यात आली होती.

2022 च्या डेव्हिस चषक टेनिस हंगामात आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने कॉसमॉस टेनिस समुहाच्या मदतीने प्राथमिक गटातील लढतीसाठी चार शहरे यजमानपद स्वीकारणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या बाद फेरीतील सामने अबु धाबीमध्ये खेळविण्याची शक्यता आहे. पुढील वर्षीच्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेसाठी यजमान शहरांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून  संघांच्या संख्येमध्ये कपात करण्यात येणार आहे.

Related Stories

भारत-विंडीज मालिका कोलकाता,अहमदाबादमध्ये ?

Amit Kulkarni

बीसीसीआयची स्थिती… तेलही गेले, तूपही गेले!

Patil_p

मँचेस्टर युनायटेडचा विजय

Patil_p

रुपा गुरुनाथ यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा

Patil_p

पीआर श्रीजेशला 1 कोटी रुपयांचे इनाम

Patil_p

हॉकीपटूंसाठी एफआयएचची मार्गदर्शक सुची

Patil_p
error: Content is protected !!