तरुण भारत

ऍशेस मालिकेतील कसोटी केंद्रामध्ये बदल

वृत्तसंस्था / सिडनी

यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात होणाऱया आगामी ऍशेस क्रिकेट मालिकेतील पाचव्या सामन्याच्या ठिकाणात बदल करण्यात आला आहे. या मालिकेतील पाचवा सामना पर्थमध्ये खेळविला जाणार होता. या सामन्याचे ठिकाण लवकरच जाहीर केले जाईल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने सांगितले.

Advertisements

कोरोनाच्या ओमीक्रॉन या नव्या विषाणूचा प्रसार जगातील विविध देशांमध्ये होत असल्याने ऑस्ट्रेलियाने कोरोना संदर्भातील सर्व नियम अधिक कडक केले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या ऍशेस मालिकेला शौकिनांचा अमाप प्रतिसाद मिळतो. या मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी 14 ते 18 जानेवारी दरम्यान पर्थमध्ये खेळविली जाणार होती. पण पर्थ स्टेडियमच्या संबंधित अधिकाऱयांनी ही कसोटी भरविण्यास असमर्थता दाखविली असल्याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख कार्यकारी हॉक्ले यांनी दिली. आता शेवटच्या कसोटीसाठी पर्यायी स्टेडियमचा शोध घेतला जाईल. पर्थच्या परिसरात बाहेरून येणाऱया प्रवाशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. न्यू साऊथवेल्स, व्हिक्टोरिया आणि दक्षिण ऑस्ट्रेलियातून पर्थची सरहद्द पार करणाऱया प्रवाशांसाठी 14 दिवसांचे सक्तीचे क्वारंटाईन राहील. या ऍशेस मालिकेतील सिडनीतील चौथी कसोटी 9 जानेवारीला संपणार आहे. या मालिकेतील दुसरी कसोटी 16 ते 20 डिसेंबर दरम्यान ऍडलेडमध्ये होणार आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिकेला येत्या बुधवारपासून प्रारंभ होणार आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये होबार्टमध्ये ऑस्ट्रेलिया आणि अफगाण यांच्यात कसोटी सामना खेळविला गेला होता.

Related Stories

अँडरसनचे पाच बळी, भारत सर्व बाद 364

Patil_p

रोनाल्डोचा वाढदिवस अन् कोल्हापूरी चाहत्यांची सामाजिक बांधिलकी

Abhijeet Shinde

बीसीसीआयकडून विविध पदांसाठी अर्जांची मागणी

Patil_p

भारत-इराण महिला फुटबॉल लढत गुरूवारी

Patil_p

हिमाचल प्रदेशकडे विजय हजारे करंडक

Patil_p

मिराबाई चानूला उत्तर प्रदेश सरकारतर्फे 1.5 कोटी प्रदान

Patil_p
error: Content is protected !!