तरुण भारत

ऍस्टन व्हिलाची लिसेस्टरवर मात

वृत्तसंस्था / बर्मिंगहॅम

प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत रविवारी येथे झालेल्या सामन्यात ऍस्टन व्हिला संघाने लिसेस्टर सिटीचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या विजयामुळे ऍस्टन व्हिलाने स्पर्धेच्या गुणतक्त्यात सरस गोलसरासरीच्या जोरावर 10 वे स्थान मिळविले आहे.

Advertisements

या सामन्यात 14 व्या मिनिटाला बचावफळीतील एझरी कोन्साने बार्नेसच्या पासवर ऍस्टन व्हिलाचे खाते उघडले. 17 व्या मिनिटाला इमिलेनो ब्युनेडियाने हेडरद्वारे गोल नोंदवून लिसेस्टर सिटीला बरोबरी साधून दिली. मध्यंतरापर्यंत दोन संघ 1-1 असे बरोबरीत होते. सामन्याच्या उत्तरार्धातील नवव्या मिनिटाला कोन्साने ऍस्टन व्हिलाचा तसेच वैयक्तिक दुसरा गोल नोंदवून लिसेस्टर सिटीचे आव्हान संपुष्टात आणले.

Related Stories

दुहेरी दौऱयासाठी 30 जणांचा संघ पाठविण्याची पीसीबीची योजना

Patil_p

चीनच्या फुटबॉल क्लबची हकालपट्टी

Patil_p

विंडीजचा दक्षिण आफ्रिकेवर 8 गडय़ांनी विजय

Patil_p

ऑलिम्पिकसाठी तीन ऍथलिटस्ना तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्णची अट

Patil_p

आशिया चषक स्पर्धा आयोजनाचा निर्णय स्थगित

Patil_p

बोपण्णा-शेपोव्हॅलोव्ह उपांत्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni
error: Content is protected !!