तरुण भारत

चौशिंगाची शिकार करणारे दोन जण वनविभागाच्या ताब्यात

प्रतिनिधी/ सातारा

जांभळेवाडी (कण्हेर)ता. सातारा येथे वन्यप्राणी चौशिंगाची शिकार करणाऱया दोन जणांना वनधिकाऱयानी ताब्यात घेतले. या प्रकरणी नथू सखाराम करंजकर (रा. जांभळेवाडी), राजकुमार मारूती इंदलकर (रा.कळंबे) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. या दोन्ही संशयिताना न्यायालयाने 7 नोव्हेंबरपर्यंत वनकोठडी सुनावली आहे. 

Advertisements

 याबाबत वनविभागाने दिलेली अधिक माहिती अशी, वन्यप्राणी चौशिंगाची शिकार करून संशयित नथू करंजकर, राजकुमार इंदलकर हे घेवून जात असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. नि. गो चव्हाण यांना मिळाली. यावेळी त्यांना छापा टाकून यांना रंगेहाथ पकडले. संशयिताकडून वन्यप्राणी चौशिंगा जखमी अवस्थेत व प्लास्टिक गोणी 1 नग इत्यादी मुद्देमाल जप्त केला आहे. हा गुन्हा उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले, वनरक्षक सुहास भोसले, राज मोसलगी, मारूती माने, कायम वनमजुर गोरख शिरतोडे यांनी उघडकीस आणला. 

Related Stories

राष्ट्रीय क्रिकेट हंगामाला आजपासून प्रारंभ

Patil_p

संकल्प गुप्ता भारताचा 71 वा ग्रॅण्ड मास्टर

Patil_p

पृथ्वी शॉचा भारत अ संघात समावेश

Patil_p

सिमॉन बाईल्सची फ्लोअरमधूनही माघार

Patil_p

कर्नाटकाच्या विजयात पडिक्कलचे शतक

Patil_p

इंडिया क महिला संघाकडे चॅलेंजर करंडक

Patil_p
error: Content is protected !!