तरुण भारत

सातारा तालुक्यात गावागावात शिवसेनेची विचारधारा रुजवणार

प्रतिनिधी/ सातारा

राज्याचे मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या संकल्पनेप्रमाणे गावागावात घराघरात शिवसैनिक निर्माण झाला पाहिजे. याकरता वरीष्ठांच्या आदेशानुसार सातारा तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये शिवसेनेच्यावतीने संपर्क अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून योजनांची माहिती दिली जात आहे. शिवसेनेची गाव तेथे शाखा निर्मिती केली जाणार आहे. असे प्रतिपादन सातारा तालुका प्रमुख दत्ताभाऊ नलावडे यांनी केले.

Advertisements

पाटखळ, वनवासवाडी, कोडोली, वर्णे जिल्हापरिषद गटातील वाढे, आरफळ, आरळे, वनवासवाडी, देगाव येथे शिवसंपर्क अभियान राबविण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी  जेष्ठ शिवसेना पदाधिकारी हैबतबापू नलवडे, दिलीपतात्या  वाघमळे, चंद्रकांतआबा साळुंखे, शिवसेना उपतालुकाप्रमुख रमेश बोराटे, वाहतूक सेना तालुकाप्रमुख सचिन जगताप, वाढे ग्रामपंचायत सरपंच संदेश देखणे, वाढे सोसायटी चेअरमन संजूअण्णा नलावडे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर नलावडे, जयवंत नलावडे, सुनीलनाना नलावडे, गणेश नलावडे, मनोज नलावडे, जितेंद्रसिंग नलावडे, अजित नलावडे, नलावडे, विशाल नलावडे, श्रीनाथ नलावडे, निशांत  नलावडे, डॉ साहिल पिसाळ, प्रशांत जाधव, आरफळचे तंटामुक्ती अध्यक्ष नितीन साबळे, प्रकाशआप्पा पाटील, विठ्ठल पवार, आरळेचे अभिजित वाघमळे, संभाजी वाघमळे, सुरेश वाघमळे, विभागप्रमुख संजय गायकवाड, संजय जाधव, सागर वर्णेकर, विक्रांत काळंगे, निलेश चव्हाण, शाखाप्रमुख संजय जाधव, अमोल साळुंखे, अजित घाडगे, नितीन साळुंखे, मंगेश जाधव, वसंत जाधव, विलास वर्णेकर, मनीष बोराटे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना दत्ताभाऊ नलावडे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्भवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, सातारा-सांगली-कोल्हापूर  संपर्कनेते दिवाकर रावते, सातारा सांगली समन्वयक दगडूदादा सकपाळ यांच्या सूचनेनुसार आणि सातारा सांगली संपर्कप्रमुख नितीन बानूगडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात येत आहे. आगामी येवू घातलेल्या जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुका ताकदीने लढवण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

कुपर कंपनीत चोरी करणारा चोरटा जेरबंद

Patil_p

सातारा : औंधचा सुपुत्र डॉ. आशिष पवारची सहाय्यक शास्त्रज्ञपदी निवड

Abhijeet Shinde

कोरोनाची धास्ती : सोलापूरमध्ये विकेंड लॉकडाऊन!

Rohan_P

बँक अकाऊंटची माहिती घेऊन दोन लाखाला गंडा

Patil_p

साताऱ्यात 78 बेडची उभारणी

datta jadhav

सातारा : कराडातील व्यापारयाला संपवण्याचा कट उधळला

Abhijeet Shinde
error: Content is protected !!