तरुण भारत

चेअरमन नितीन पाटील, व्हाईस चेअरमन अनिल देसाई यांच्या निवडीने जल्लोष

प्रतिनिधी/ सातारा

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरन कोण होणार याकडे जिह्याच्या कानाकोपऱयातून सगळयांच्या नजरा होत्या. कोण अध्यक्ष होणार यासाठी मीडियाचे फोन खणाण होते. बँकेत कार्यकर्ते होते त्यांचेही फोन वाजत होते. अध्यक्षपद कोणाला द्यायचे याबाबत अगदी अकरा वाजेपर्यंत नुसत्याच चर्चा होत्या. परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडे चेअरमनपदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी रामराजेंनी नितीन काकांचे नाव घेताच सगळय़ांनी त्यास पाठींबा दिला अन् लगेच त्यांचा अर्ज भरला तसेच उपाध्यक्षपदासाठी अनिल देसाई यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. दोन्ही निवडी या बिनविरोध पार पडल्या. शेवटच्या क्षणी नितीन काकांचे नाव घेण्यात आले.

Advertisements

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमनपदासाठी अनेकजण रेसमध्ये होते. नेते मंडळीकडे अनेकांनी गाठीभेटी घेवून आपली इच्छा व्यक्त केली होती. परंतु नेते मंडळींनी राष्ट्रवादी काँग्रेसचा जो जिह्यात दमदार काम करतो आहे त्यालाच चेअरमनपद देण्याचा शब्द रामराजेंकडे टाकला. त्यानुसार रात्री आमदार मकरंद पाटील यांना चेअरमन करण्यासाठी फोन गेल्याची चर्चा रंगत होती. परंतु मकरंद पाटील यांनी मतदार संघाचा व्याप असल्याने मला चेअरमनपद नको असे स्पष्ट सांगितले. त्यानंतर त्यांचेच बंधू नितीन काकांना चेअरमन करण्यासाठी सकाळी रामराजेंकडे पवारसाहेबांचा मेसेज आला. अन् रामराजेंनी सर्वांसमोर नितिन काकांचे नाव जाहीर केले. त्यानुसार अर्ज दाखल केला गेला. अर्ज दाखल केल्याची माहिती लगेच कार्यकर्त्यांना बाहेर समजली. कार्यकर्त्यांनी बँकेबाहेर जल्लोष केला.

दोघे भाऊ गुलालामध्ये निघाले न्हावून

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीत नितीन काका चेअरमन झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा बँकेच्या आवारात गुलालाची उधळण करत फटाके फोडून जल्लोष केला. नितीन काकांनी जिल्हा र्बॅकेच्या आवारातील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळय़ास अभिवादन केले. कार्यकर्त्यांनी आमदार मकरंद पाटील व नितीन काका दोघांना गुलालांमध्ये अक्षरश न्हावून सोडले.

कार्यकर्त्यांनी फटाके फोडले अन्

जिल्हा बँकेच्या बाहेर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. त्याच फटाक्यामुळे लावलेल्या काही दुचाकींच्या सीट्सचे नुकसान झाल्याची काही दुचाकीधारकांनी सांगितले. त्यामुळे फटाके वाजवण्यास परवानगी कार्यकर्त्यांना दिली काय?, असाही प्रश्न उपस्थित होत होता. 

शिवेंद्रराजेंचे आभार

बँकेच्या प्रथेप्रमाणे निवडणूक पार पडली आहे. बिनविरोध झालेली आहे. बँकेच्या पॅनेलचे विषय जरी संपला असला तरी स्पष्ट सांगायाचे झाले तर जिल्हा बँक नंबर एकची बँक आहे. आणि अजून आंतरराष्ट्रीय पातळीवर कशी पुढे नेता येईल, माझी तर इच्छा आहे की जगात रोबो बँक नावाची सहकारी बँक आहे. त्या बँकेच्या धर्तीवर आपल्या बँकेची तुलना व्हावी, कामकाज चालावे यासाठी मला सर्व सहकारी संचालकांचे सहकार्य मिळावे. सगळय़ांना सोबत घेवून बँकेला पुढे घेवून जाण्याचा प्रयत्न करेन. शिवेंद्रबाबांचे तर आभार मानेन की त्यांनी  मनाचा मोठेपणाचा मोठेपणा हे सारे घडवून आणले.

रामराजे नाईक-निंबाळकर विधान परिषदेचे सभापती

तात्यांची आठवण येते आहे

आमचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब, विधान परिषदेचे सभापती रामराजें साहेब, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, उदयन महाराज साहेब यांच्यासह सर्वच मंडळींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला. माझी जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी एकमताने निवड केली. त्याबद्दल मी या सर्व नेते मंडळींचे आभार व्यक्त करतो. जिल्हा बेँकेला इतिहास आहे की ही बँक चव्हाण साहेबांनी स्थापन केली आहे. किसन वीर आबांच्या नेतृत्वाखाली बँकेची वाटचाल झालेली आहे. जिह्यातील अनेक दिग्गजांनी या बँकेचे नेतृत्व केले. कै. विलासकाका, कै. अभयसिंह महाराज, कै. लक्ष्मणराव पाटील साहेब या सर्वांनी या बँकेचे नेतृत्व केलेले आहे. या बँकेला एका वेगळय़ा उंचीवर नेवून ठेवले आहे. या राज्यात तसेच देशात बँकेचा नावलौकीक कर्तत्वामुळे आणि कामकाजामुळे उंचावलेला आहे. त्या पद्धतीनेच बँकेचे कामकाज होईल आणि सर्व संचालकांना एकत्र घेवून या बँकेचे कामकाज चालवल जाईल. बँकेचा नावलौकिक पुर्वी होता त्याप्रमाणेच राहिल. सर्वसामान्य शेतकऱयांसाठी काम करेल याची मी ग्वाही देतो. तात्या ज्या खुर्चीवर बसले होते. त्याच खुर्चीवर बसण्याची संधी मला मिळाली. तात्यांची आठवण येते आहे.

नितीन पाटील चेअरमन जिल्हा बँकेचे

दिलेल्या संधीचे सोने करु

सर्व संचालक मंडळाने उपाध्यक्ष करुन काम करण्याची संधी दिली. या बँकेत मी गेली 20 वर्ष संचालक म्हणून काम करतो आहे. व्हाईस चेअरमनपदाची सुद्धा दुसरी टर्म आहे. या बँकच्या कामकाजाची पूर्ण माहिती आहे. ही बँक देशात एक नंबरची बँक आहे. नाबार्डने सलग सन्मानित केलेली बँक आहे. बँकेची उंची टिकवून ठेवण्याचे काम करणार आहे. बँकेत येणाऱया सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम मी आणि बँकेचे चेअरमन नितीन काका पाटील आम्ही करु. अशी ग्वाही देतो. त्यांनी दिलेल्या संधीच आम्ही सोन करु,

अनिल देसाई उपाध्यक्ष

मी अध्यक्षपदासाठी इच्छूक होतो

काल आम्ही सगळे बसलो होतो. त्यावेळी सगळय़ांची चर्चा झाली आणि सगळयांनी सांगितले की सर्व एकमताने ठरवू त्या प्रमाणे निवड करायची. बँकेच्या चेअरमनपदासाठी निवडणूका झाल्याची प्रथा नाही. प्रथेप्रमाणे बिनविरोध निवडी झाल्या आहेत. त्याप्रमाणे नितीन काकांचे नाव चेअरमनपदाला तसेच उपाध्यक्षपदाला अनिल देसाईचे नाव ठरवण्यात आले. दोन्ही निवडी सर्वानुमते बिनविरोध झाल्या. मला नक्की खात्री आहे हे दोघेपण चांगल्या पद्धतीने बँकेचे कामकाज करतील. अध्यक्षपदाला मी इच्छूक होतो. राजू शेठ होते. दत्तानाना उपाध्यक्षपदाला इच्छुक होते. शिवरुपराजेही होते. इच्छा तर प्रत्येकांने व्यक्त केली होती. सत्यजितसिंह पाटणकर यांची पहिली टर्म असली तरीही इच्छा सगळय़ांनी व्यक्त केली होती. बसून सगळयांनी एक मताने नाव ठरवलं आणि निवडी केल्या. त्यानुसार कसलाही वाद झाला नाही.

Related Stories

राधानगरी तालुक्यातील सव्वाकोटीच्या मुख्यमंत्री सडक योजनेचा रस्ता दर्जाहीन

Abhijeet Shinde

वडूजला एकाच घराला कोरोनाचा विळखा

Patil_p

खोची येथील श्री.भैरवनाथ मंदिरातील नवरात्रोत्सव रद्द

Abhijeet Shinde

राज्यपाल राजकारण करत असल्याच्या सरकारच्या आरोपावर भगतसिंह कोश्यारी म्हणाले…

Abhijeet Shinde

पुण्यात कोरोनाने दोन महिलांचा मृत्यू

prashant_c

मैत्रिणीच्या घरी चोरी करणारी महिला अटकेत

datta jadhav
error: Content is protected !!