तरुण भारत

बारा फुटी पोट्रेट पाहून भारावले बच्चन

प्रतिनिधी/ कराड

विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूरच्या ग्राफिक डिझाईन विभागाचे प्रमुख कराडमधील प्रा. सतीश उपळावीकर यांनी केवळ सव्वा तासात अभिनेते महानायक बच्चन यांचे 100 स्क्वेअर फूट पोट्रेट बनवले आहे. बारा बाय साडेआठ फुटांचे हे पोट्रेट असून केबीसीच्या सेटवर पाहिल्यानंतर स्वतः अमिताभ बच्चनही भारावले.

Advertisements

कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम पाहात पाहात प्रा. उपळावीकर यांनी अमिताभ बच्चन यांचे हे पोट्रेट बनवले आहे. याकामी प्रा. उपळावीकर यांचे चिरंजीव ऋषिकेश यांनीही मोलाचे सहकार्य केले. केबीसी सेटवर महानायक अमिताभ बच्चन यांना कराडमधील अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपसोबत प्रा. उपळावीकर यांनी हे पोट्रेट अमिताभ बच्चन यांना भेट दिले.  

‘अरे अपने कैसे बनाए ए सब बहूत खुब मैं इसे जलसा पर लेकर जाऊंगा’ असा शब्दात बच्चन यांनी प्रा. उपळावीकर यांचे कौतुक केले.

प्रा. उपळावीकर यांचे चिरंजीव ऋषिकेश यांनी बनवलेले अर्कचित्र महानायक अमिताभ बच्चन यांना प्रेझेंट देण्यात आले. या दोन्ही चित्रांच्या प्रतिकृतीवर अमिताभ बच्चन यांनी स्वाक्षरी केली. यावेळी अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपचे अध्यक्ष सतीश मोरे, खजिनदार सतीश भोंगाळे, डॉ.चिन्मय एरम, सलीम मुजावर, गजेंद्र सुर्वे यासह 50 बच्चन प्रेमी उपस्थित होते.

अमिताभ बच्चन यांना भेटणे, त्यांना स्वतः काढलेले चित्र भेट देणे, हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च सुंदर क्षण आहे. त्यांची उर्जा आणि उत्साह पाहून मी भारावून गेलो आहे. एबीपी ग्रुपमुळे हे शक्य झाले आहे, अशी प्रतिक्रिया प्रा. सतीश उपळावीकर यांनी व्यक्त केली.

Related Stories

सुधारीत नागरीकत्वाच्या विरोधात म्हसवड कडकडीत बंद

Patil_p

सातारा जिल्ह्यात आज 62 नागरिकांना दिला डिस्चार्ज,नवे 11 रुग्ण

Abhijeet Shinde

लक्ष्मण माने, घरतांवर गुन्हा दाखल होण्यासाठी आंदोलन

Patil_p

शाहूपुरीत 2 दुकाने फोडून 12 हजारांची रोकड लांबवली

Patil_p

अकरा धारदार शस्त्रांसह एकास अटक

datta jadhav

सातारा : दुचाकी अपघातात माजी सैनिकाचा मृत्यू

datta jadhav
error: Content is protected !!