तरुण भारत

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी नितीनकाका पाटील

प्रतिनिधी/ सातारा

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी वाई विकास सेवा सोसायटीतून बिनविरोध निवडून आलेले नितीनकाका पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांची निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. अध्यक्षपदी बाबा, काका की दादा अशी तिघांमध्ये लढत होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नितीन काकांचे नाव रामराजेंच्याजवळ सांगितल्याने काकांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले अन् सगळय़ांनी त्यास अनुमोदन देऊन त्यांचे स्वागत केले. त्यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या निवडी निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या.

Advertisements

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्याच हातात सत्ता गेल्याने अध्यक्षही राष्ट्रवादी काँग्रेसचा असावा अशी मागणी जोर धरत होती. त्याच अनुषंगाने वाईचे नितीनकाका पाटील, महाबळेश्वरचे राजेश राजपुरे, पाटणचे सत्यजितसिंह पाटणकर यांच्याकडून अध्यक्षपदाची मागणी होत होती. परंतु दुसऱया बाजूला भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे यांनीही अध्यक्षपदासाठी जोरदार फिल्डींग लावत प्रथम उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सेटिंग लावले होते. त्यानंतर आपली इच्छा शरद पवार यांच्याकडेही व्यक्त केली होती. त्यामुळे अध्यक्षपदासाठी नक्की कोणाची वर्णी लागणार हे समजत नव्हते.

जिल्हा बँकेच्या चेअरमन निवडीकरता सर्वच संचालकांनी हजेरी लावली होती. त्यामध्ये विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक -निंबाळकर, खासदार उदयनराजे, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार शिवेंद्रराजे, शिवरुपराजे खर्डेकर, शेखर गोरे, सुनील खत्री, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, कांचन साळुंखे, ऋतुजा पाटील असे सर्वच संचालक उपस्थित होते. निवडीच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार रामराजेंना शरद पवार यांनी सांगितलेल्या नावानुसार सगळय़ांसमोर नितीन काका यांना चेअरमनपदासाठी अर्ज भरायला सांगितले अन् व्हाईस चेअरमनपदासाठी अनिल दसाई यांचा एकमेव अर्ज दाखल केला. एकेक अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांनी बिनविरोध निवडी जाहीर केल्या. दुपारी 12 वाजता निवडी जाहीर होताच कार्यकर्त्यांनी बँकेच्या बाहेर जल्लोष केला तर बँकेत जे कार्यकर्ते होते त्यांनी निवडीच्या ठिकाणी जावून चेअरमन नितीन पाटील आणि व्हाईस चेअरमन अनिल देसाई यांचे अभिनंदन केले.

दोन्ही राजेंचे हातात हात

चेअरमन पदाची निवड होताच नितीन पाटील यांना खासदार उदयनराजे यांनी शुभेच्छा दिल्या. विधानपरिषदेचे सभापती रामराजेंनीही शुभेच्छा देताच त्या दोघांचे चरणस्पर्श करुन नितीनकाकांनी आर्शिवाद घेतले. दोन्ही राजे एकमेकांच्या हातात हात घेऊन दोघे सभागृहातून बाहेर पडले.

हलगीबाजा अन् गुलालाची उधळण

नितीन काका जिल्हा बँकेचे चेअरमन झाल्याचे समजताच वाईतील कार्यकर्त्यांनी बँकेच्या आवारात गुलाल आणून जल्लोष केला तर काही कार्यकर्त्यांनी लगेच वाढेश्वर येथील हलगीबाजा बोलवून बँकेच्या आवारात छोटीशी मिरवणूक काढली. कार्यकर्त्यांनी नितीन काकांच्या नावाच्या घोषणा दिल्या.

Related Stories

50 रूग्णांची झाली ऍटीबॉडी टेस्ट

Patil_p

‘व्हायरल’च्या नावाखाली चाचणी टाळणे धोकादायक

datta jadhav

बालकावर अनैसर्गिक कृत्य करुन खून करणारा अल्पवयीन ताब्यात

datta jadhav

रेशनच्या दुकानाला लागलेल्या आगीत साडे चार लाखाचे नुकसान

Patil_p

पालिका कर्मचाऱयांची दिवाळी झाली गोड

Patil_p

घरपट्टी दरवाढी मागे घ्या-हॉटेल संघटनेची मागणी

Patil_p
error: Content is protected !!