तरुण भारत

जिल्हय़ात 235 एसटी कर्मचाऱयांची सेवा समाप्त

प्रतिनिधी/ रत्नागिरी

एसटी कर्मचारी विलिनिकरणाच्या मुद्दयावर अजूनही ठाम आहेत. आंदोलनात जरी फुट पडली तरीही अनेक कर्मचारी आंदोलनात ठाण मांडून आहेत. एसटी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आतापर्यंत सोमवार पर्यंत तब्बल 500 कर्मचारी एसटीच्या सेवेत रुजू झाले आहेत. प्रवाशांचा दबाव वाढत असल्याने आता कारवाईचे धोरण महामंडळाने स्वीकारले आहे. जिह्यातील 34 कर्मचाऱयांच्या बदल्या, 288 जणांना निलंबित तर 235 कर्मचाऱयांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.

Advertisements

  रत्नागिरी एसटी महामंडळाच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱयांना अडथळा करणाऱया तब्बल 43 जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 288 जणांना निलंबित तर 235 कार्मचाऱयांची सेवा या प्रशासनस्तरावरून समाप्त करण्यात आली आहे. तर माळनाका येथील विभागिय कार्यालसमोर उपोषण करणार्यांना कार्यालय परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासन आक्रमक भूमिका घेत असताना कर्मचारी संघटना नेमके काय करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

   आंदोलनकर्त्या कर्मचाऱयांमध्ये फूट पडू लागली असल्याचे चित्र असून आता सोमवार पर्यंत तब्बल 500 कर्मचारी एसटीच्या सेवेत रुजू झालेले आहेत. तसेच सोमवार सायंकाळ पर्यंत जिल्हय़ातील एसटी कर्मचाऱयांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहे. तब्बल 34 कर्मचाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये निलंबित कर्मचाऱयांचाही समावेश आहे. बदल्या झालेल्या कर्मचाऱयांसह निलंबित, सेवा समाप्त केलेल्या कर्मचाऱयांनी अंतिम नोटीस न स्वीकारल्याने त्यांच्या नोटीसा नोटीस बोर्डवर प्रशासनाने लावल्या आहेत.  

विद्यार्थी, नागरिकांना एसटी बस बंदचा मोठा फटका

एसटी कर्मचाऱयांनी पुकारलेल्या या संपाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. शाळा, महाविद्यालये सुरु झाली आहेत. ग्रामीण भागातील दळणवळणाचे प्रमुख साधन असलेली एसटी सेवा बंद आहे. त्यामुळे शाळकरी, तरूण, नागरिकांचे व्यवहार कोलमडले आहेत.

ती फेरी लग्न सोहळ्यासाठी

सोमवारी सकाळी रत्नागिरी ते हुबळी आंतरराज्य वाहतूकीची एसटी रवाना झाल़ी मात्र ही एसटी लग्नासोहळयासाठी आरक्षित केल्याची माहिती वाहतूक अधिकारी अनिल मेहत्तर यांनी दिल़ी हा प्रांसगिक करारानुसार ही बस रवाना करण्यात आल्याची माहीती मेहत्तर यांनी दिल़ी

Related Stories

अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल जाहीर

Patil_p

लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय आपल्या दारी

Patil_p

कोकण मार्गावर ‘या’ तारखेपासून धावणार दोन फेस्टिवल स्पेशल रेल्वे

Abhijeet Shinde

रत्नागिरी : नांदगावात सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

Abhijeet Shinde

मुंबई-सावंतवाडी स्वतंत्र ‘एक्प्रेस वे’

Omkar B

स्वत:चा जीव पणाला लावत वाचविला कामगाराचा जीव

NIKHIL_N
error: Content is protected !!