तरुण भारत

रायगड किल्याला भेट देणे हे प्रत्येक भारतीयांचा अभिमान

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन

किल्ले रायगड / प्रतिनिधी

Advertisements

         भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज किल्ले रायगडाला भेट दिली,यावेळी त्यांनी जाणता राजा छ. शिवाजी महाराज यांच्या समाधीला भेट देत पुष्पहार अर्पण करीत त्यांना अभिवादन केले.राष्ट्रपतींचे आज दुपारी 12.30 वाजता आगमन झाल्या नंतर ते रोपवेने किल्ले रायगडावर गेले.

         छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या आणि याच ठिकाणी महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या किल्ले रायगडाला देशाचे सर्वोच्च पद असलेल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भेट दिली.गेल्या आठवडय़ा पासुन रायगडावर त्यांच्या स्वागताची तयारी सुरु होती.दिल्ली पासुन तालुका पोलिस ठाण्यां पर्यत संरक्षण यंत्रणा गडावर कार्यरत होती.किल्ले रायगडावरील होळीच्या माळावर हेलिवाप्टर उपरविण्यास शिवभक्तांनी विरोध दर्शविल्या नंतर हेलिकॉप्टर पाचाड येथे दाखल झाले.रायगड रोपवे या ठिकाणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी,खा.संभाजीराजे,खा.सुनिल तटकरे,पालकमंत्री अदिती तटकरे,आमदार भरत गोगावले,जिलहाधिकरी महेंद्र कल्याणकर आदी मान्यवरांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले.राष्ट्रपतींनी यावेळी राजसदर,होळीचा माळ,जगदीश्वर मंदिर,आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळाला भेट दिली.यावेळी त्यांनी छ.शिवाजी महारांजाच्या समाधीस्थळाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन वैले.

         आपल्या अभिभाषणांमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रायगडाला भेट देणे हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा बाब आहे.आजच्या रायगड भेटीला मी तीर्थक्षेत्र मानतो,विसाव्या शताका मध्ये महात्मा गांधींनी स्थापन केलेले स्वराज्य हे छ.शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराजां पासुन प्ररित होते असे ते म्हणाले.आज राष्ट्रपती हे सहकुटूंब रायगड किल्ल्यावर आले होते,तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या नंतर 36 वर्षाने राष्ट्रपती किल्ले रायगडावर येण्याचा योग आला.त्याच्या आगमनाची तयारी गेल्या आठ दिवसा पासुन करण्यांत येत असताना कडेकोट बंदोबस्त करण्यांत आला होता.राष्ट्रपती हे नियोजित दौऱया प्रमाणे दुपारी साडेबार ते दिड वाजे पर्यत थांबणार होते,परंतु राष्ट्रपती व त्यांच्या कुटूंबीयांची भोजन व्यवस्था गडावर करण्यांत आल्यामुळे चार वाजे पर्यत ते गडावरच थांबले होते.राष्ट्रपती करीता गडावर त्यांच्या करीता विषेश बग्गीची व्यवस्था संयोजकां कडून करण्यांत आली होती.या बग्गीचा वापर राष्ट्रपतीनी होळीचा माळ ते जगदीश्वर मंदिर या अंतरा मध्ये केला.त्यांनी यावेळी पुस्तक प्रदर्शनाला देखिल भेट दिली.तसेच दोन पुस्तकांचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यांत आले.तसेच गडावर आधारीत माहिती पटाचे देखिल प्रकाशन यावेळी करण्यांत आले.

         राष्ट्रपती किल्ले रायगडावर येणार असल्याने पर्यटकांना बंदी घालण्यांत आली होती,तर रस्त्यावरील प्रवासी वाहाने दखिल रोखण्यांत आली होती.यामुळे दैनंदिन कामाकरीता येणाऱया नागरिकांचे हाल तर झाले परंतु गैर सोय देखिल झाली.विद्यार्थाना देखिल रोखण्यांत आले त्यामुळे मुले शाळेत जाऊ शकली नाहींत,मोल मजुरी करण्या साठी जाणाऱया मजुरांना महिलांना देखिल रोखण्यांत आले तर पाचाड गावांमध्ये घराच्या बाहेर देखिल पहाण्याला बंदी घालण्यांत आली होती त्यामुळे सर्व सामान्या जनतेला त्यांचे दर्शन  देखिल होऊ शकले नाही.

Related Stories

धक्कादायक : रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासात 116 कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

… अन्यथा आरोग्य क्षेत्रातील सर्व सरपंच आंदोलन करणार-रामसिंग राणे

Ganeshprasad Gogate

चार हजार शेतकऱयाची बँक खाती ‘निराधार’

Patil_p

जिह्याला दिलासा; तीनच नवे रुग्ण

Omkar B

चर्चांचीच उड्डाणे, मुलभूत सुविधांकडेही दुर्लक्ष

NIKHIL_N

निकष डावलून सिव्हीलमध्ये वैद्यकीय अधिकारी भरती?

Patil_p
error: Content is protected !!