तरुण भारत

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत गोल्डन बुद्धिबळ संघटनेचे घवघवीत यश

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित बुद्धिबळ महोत्सवात गोल्डन चेस अकादमीच्या बुद्धिबळपटूंनी घवघवीत यश संपादन केल्यानंतर त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.

Advertisements

मिलेनियम गार्डन येथे आयोजित करण्यात आलेल्या बुद्धिबळ महोत्सवात आठ वर्षांखालील वयोगट मुलांच्या विभागात गीतेश सागेकरने दुसरा क्रमांक तर सुयश उडकेरीने तिसरा क्रमांक पटकाविला. दहा वर्षांखालील वयोगट मुलांच्या विभागात अनिरुद्ध दासरीने पहिला तर गितेश सागेकरने दुसरा क्रमांक मिळविला. बारा वर्षांखालील वयोगट मुलांच्या विभागात माधव दासरीने पहिला तर शिवनागराज ऐहोळेने तिसरा क्रमांक मिळविला. 14 वर्षांखालील वयोगटात उपाध्येने तिसरा क्रमांक मिळविला.

आठ वर्षांखालील वयोगटात मुलींच्या विभागात आदिती मिराजीने तिसरा क्रमांक, बारा वर्षांखालील वयोगटात वैष्णवी व्ही. हिने दुसरा क्रमांक तर 14 वर्षाखालील वयोगटातही वैष्णवी व्ही. हिने दुसरा क्रमांक पटकाविला.

बीडीसीए उपाध्यक्ष दत्तात्रेय राव व अन्य मान्यवरांच्या हस्ते विजेत्या बुद्धिबळपटूंना गौरविण्यात आले. बुद्धिबळ प्रशिक्षक प्रशांत अणवेकर यांचे या बुद्धिबळपटूंना मार्गदर्शन लाभत आहे. या बुद्धिबळपटूंची निवड राज्यस्तरीय स्पर्धेकरिता करण्यात आली आहे.

Related Stories

डिप्लोमाच्या मागील सेमिस्टरच्या परीक्षा रद्द करा!

Amit Kulkarni

फिटनेस प्रशिक्षिका संध्या पाटील यांच्याकडून सूर्यनमस्कार

Amit Kulkarni

शिवबसवनगर येथील श्री ज्योतिर्लिंगाला शंकराची आरास

Patil_p

कडोलीच्या अभिजित पाटीलचे के-सेट परीक्षेत यश

Patil_p

रामतीर्थनगर येथे क्वारंटाईन करण्यास विरोध

Patil_p

विद्युत विभागाचे खासगीकरण नको!

Amit Kulkarni
error: Content is protected !!