तरुण भारत

वेणुग्राम हाफ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

800 हून अधिक स्पर्धकांचा समावेश, जवानांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील जेत्यांचा सन्मान

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम व लेकव्हय़ू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या हाफ मॅरेथॉन स्पर्धा मोठय़ा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत जवानांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.

सीपीएड मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या हाफ मॅरेथॉनचे उद्घाटन एमएलआयआरसीचे मेजर जनरल पी. एस. बाजवा, कर्नल मनोज शर्मा यांच्या हस्ते ध्वज उंचावून करण्यात आले. या स्पर्धेत 800 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.

निकाल पुढीलप्रमाणे :  5 किमे धावणे 18 ते 30 वयोगट – पुरूष विभाग 1) सुप्रित संग्रानी, 2) आकाश कंग्राळकर, 3) बसय्या हिरेमठ. महिला गट-1) रोहिणी पाटील, 2) सीया गोखर, 3) अश्विनी मेलगे. 31 ते 45 वयोगट-पुरूष 1) विरेंद्र, 2) कृष्णा नाईक, 3) गिरीष के. एम., महिला गट-1) सविता शास्त्री, 2) निधी चौगुले, 3) रेशमा कामते, 46 वरील वयोगट पुरूष 1) यशवंत परब, 2) बाळाप्पा मण्णीकेरी, 3) मुत्ताप्पा अंगडी. महिला गट-सीमा साळगावकर, 2) सुलोचना इटगी, 3) विद्या गीरकर. 10 किमे धावणे 18 ते 30 वयोगट पुरूष-1) सुनिल डी., 2) विवेक मोरे, 3) प्रधान केरूळकर, महिला गट-1) सहानी धारवाड, 2) नुरल बोहंग, 3) रसिका धामणेकर. 31 ते 45 गट-पुरूष -1) राजेश गोंजार, 2) संदीप शर्मा, 3) तन्मय नाईक. महिला-1) शोभा नंदनवाडे, 2) निरा पुरोहित, 3) जिरना शेख, 46 वरील गट -पुरूष -1) रणजित कणबरकर, 2) धर्मराज एम. पी. 3) मधुराज कुलकर्णी. महिला गट-1) मयुरा शिवलकर, 2) शालिनी वाझ, 3) वरलक्ष्मी वेंकटरामण.

10 किमे धावण्याच्या जवानांच्या स्पर्धेत 1) विपदा नायडू, 2) पवन पाटील, 3) महेश बेळगावकर यांनी विजेतेपद पटकाविले. बक्षिस वितरण मेजर जनरल पी. एस. बाजवा, कर्नल मनोज शर्मा, रोटरी वेणुग्रामचे पदाधिकारी व लेकह्यू फौंडेशनच्या पदाधिकाऱयांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पदके, प्रमाणपत्र व टी-शर्ट देऊन गौरविण्यात आले.

Related Stories

माजी केंद्रीय मंत्री बाबागौडा पाटील यांचे निधन

Rohan_P

जिल्हय़ात 26 हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान

Amit Kulkarni

पावसाची उघडीप; बटाटा रताळी काढणीला प्रारंभ

Patil_p

शिवाजी रोडवर दिवसाही पथदीप सुरू

Omkar B

विकेंड कर्फ्यूचा जनावरांच्या बाजारावरही परिणाम

Patil_p

कॅन्टोन्मेंट बोर्डचे लोकनियुक्त सभागृह बरखास्त करण्याचा आदेश

Amit Kulkarni
error: Content is protected !!