तरुण भारत

हिंडलगा रोडशेजारी ठिकठिकाणी कचऱयाचे ढिगारे-दुर्गंधीचे साम्राज्य

स्वच्छतेकडे ग्रा. पं. चा कानाडोळा

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत असून शहर स्वच्छ बनविण्यासाठी प्रशासनाने आटापिटा चालविला आहे. मात्र शहराचे प्रवेशद्वार असलेल्या उपनगरांमधील रस्त्याशेजारी कचऱयाचे ढिगारे साचत आहेत. परिसरात दुर्गंधी पसरली असून संबंधित ग्रामपंचायतींचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. विशेषतः हिंडलगा रोडवर कचऱयाचे ढिगारे साचले आहेत.

शहरातील कचऱयाची उचल करून स्मार्ट सिटी बनविण्यासाठी प्रशासन कोटय़वधी निधी खर्ची घालत आहे. मात्र शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या प्रत्येक उपनगरात रस्त्याशेजारी कचऱयाचे ढिगारे साचत आहेत. बेळगाव शहराची हद्द चोहोबाजूंनी पसरत असून हिंडलगा, कंग्राळी, पिरनवाडी, सांबरा, हलगा, कणबर्गी अशा विविध परिसरात शहराची व्याप्ती वाढली आहे. तर महापालिका आणि ग्रामपंचायतची हद्द कुठे? याची माहिती मिळणे कठीण बनले आहे. अशातच ग्रा. पं. च्या हद्दीत रस्त्याशेजारी कचऱयाचे ढिगारे साचत आहेत. सध्या बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर मिलिटरी डेअरीपासून हिंडलगा फॉरेस्ट चेकपोस्ट नाक्मयापर्यंत रस्त्याशेजारी ठिकठिकाणी कचऱयाचे ढिगारे साचले आहेत. ग्रा. पं. हद्दीमधील कचऱयाची उचल करण्यासाठी कोणतीच सुविधा उपलब्ध करण्यात आली नाही. तसेच रहिवासी वसाहतींची सख्या वाढत आहे. नवनव्या वसाहतींमध्ये स्वच्छता करण्यासाठी ग्रा. पं.  ने कर्मचाऱयांची नियुक्ती केली नाही. त्यामुळे नागरिक कचरा प्लास्टिक पिशवीमध्ये बांधून रस्त्याशेजारी टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. सर्रास शहरात जाताना किंवा सायंकाळी व सकाळी फिरावयास जाताना कचरा टाकण्यात येत असल्याचे दिसून येते. रस्त्याशेजारी कचरा टाकू नये, असे ग्रा. पं.कडून सातत्याने सांगण्यात येते. पण याची दखल घेतली जात नाही. मिलिटरी डेअरी फॉर्मजवळ कचऱयांच्या ढिगाऱयामुळे मिनी कचरा डेपो निर्माण झाला आहे. तसेच विजयनगर व सिंधी कॉलनी परिसरात कचरा टाकला जात आहे. तसेच विजयनगर पहिला बसस्टॉपजवळ रस्त्याशेजारी कचरा टाकण्यात येत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. लेप्रेसी हॉस्पिटलसमोर कचऱयासोबत मांसविक्री दुकानातील कचरा टाकला जात आहे. त्यामुळे हा रस्ता कचऱयाच्या विळख्यात सापडला आहे. खाद्यपदार्थ शोधण्यासाठी भटकी कुत्री ठाण मांडून असतात. कचऱयाच्या पिशव्या फाडून कचरा पसरवितात. त्यामुळे हा कचरा संपूर्ण रस्त्यावर पसरतो. कचरा टाकलेला परिसर व रस्ता अस्वच्छ बनला असून दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेसाठी ग्रा. पं. ना अनुदान दिले जाते. पण स्वच्छतेसाठी ग्रा. पं. कडून कोणतीच कारवाई केली जात नाही. रस्त्याशेजारील कचऱयाची उचल तीन महिन्यांतून एकदा केली जाते. त्यामुळे हा परिसर दुर्गंधीयुक्त बनला आहे. परिसरातून ये-जा करणे कठीण बनले आहे. हा कचरा टाकणाऱयांवर कारवाई करून घरोघरी जाऊन कचरा उचल करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. मात्र ग्रा. पं. कडून ही जबाबदारी टाळण्यात येत असल्याने अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण होत आहे. जिल्हा प्रशासन आणि जि. पं. अधिकाऱयांनी पाहणी करून आवश्यक उपाययोजना राबवण्याची मागणी होत आहे.

Related Stories

शिवाजी उद्यान येथे शस्त्रपुजन

Patil_p

जाहिरात शुल्क निविदेच्या रकमेत कपात

Amit Kulkarni

सोमवारी रुग्णसंख्या शून्यावर

Amit Kulkarni

हुक्केरीत दोन दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी

Patil_p

येळ्ळूर ग्रा.पं.तीवर भगवा झेंडा फडकणार

Patil_p

येळ्ळूर ग्रा.पं.तीवर पाचजण बिनविरोध?

Patil_p
error: Content is protected !!