तरुण भारत

पिरनवाडी-मच्छेतील कचरा समस्या बनली गंभीर

कचऱयाच्या ढिगाऱयांमुळे परिसरात पसरली दुर्गंधी : नागरिकांचे आरोग्य धोक्मयात : प्रशासनाचे दुर्लक्ष : योग्य उपाययोजनेची गरज, अन्यथा रोगराईचा धोका

आण्णाप्पा पाटील /बहाद्दरवाडी

Advertisements

पिरनवाडी-मच्छे गावातील कचऱयाची समस्या गंभीर बनली आहे. कचऱयामुळे स्थानिक नागरिक अक्षरशः वैतागून गेले आहेत. या परिसरात ठिकठिकाणी कचऱयाचे ढिगारे निदर्शनास येतात. कचऱयाच्या ढिगाऱयांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. इथली कचरा समस्या सुटणार तरी कधी? असा सवाल स्थानिकांतून विचारण्यात येत आहे.

गेल्या पाच-सहा वर्षापासून मच्छे व पिरनवाडीत कचऱयाची समस्या भेडसावत आहे. मात्र, प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी होत आहेत. कचऱयाजवळील दुर्गंधीमुळे आजूबाजूला राहणाऱया स्थानिकांना मात्र जगणेच मुश्कील बनले आहे.

प्रशासनामार्फत ‘स्वच्छ भारत अभियान योजनें’तर्गत स्वच्छता मोहीम व स्वच्छतेसाठी वेगवेगळय़ा योजना राबविल्या जातात. ग्रामीण भागातील कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनामार्फत आदेशही देण्यात येतात. बेळगाव शहराला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी करोडो रुपयांचा निधी खर्च करण्यात येत आहे. मात्र शहरालगतच्या मच्छे व पिरनवाडीला कचरा समस्येकडे सरकार व लोकप्रतिनिधींचे लक्ष का जात नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटू लागल्या आहेत.

पिरनवाडी येथील बेळगाव-पणजी महामार्गालगत, बेळगाव-चोर्ला रोडजवळील नाल्याच्या बाजूला, मच्छे येथील मुख्य रस्त्याच्या बाजूला, हुंचेनहट्टी परिसरात अशा ठिकठिकाणी कचऱयाचे ढिगारे पहावयास मिळतात. स्थानिक दुकानदार दुकानातील प्लास्टिक बाटल्या, केरकचरा आणून टाकत आहेत. तसेच चिकन-मटण दुकानातील टाकाऊ पदार्थ या कचऱयामध्ये टाकण्यात येत आहेत. पिरनवाडी नाल्याजवळ तर काही जणांनी कळसच केला आहे. चक्क मृत कुत्री, डुक्कर आणून टाकण्यात येत आहेत. यामुळे पिरनवाडी जिनदत्त परिसरात असहय़ दुर्गंधी पसरली असून ये-जा करणाऱयांना तोंडाला रुमाल अथवा मास्क लावूनच यावे लागते.

भटक्मया कुत्र्यांचा संचार

कचऱयामध्ये चिकन, मटणाचे टाकाऊ पदार्थ टाकण्यात येत असल्यामुळे ते खाण्यासाठी भटक्मया कुत्र्यांचाही या ठिकाणी मुक्तपणे संचार वाढला आहे. रस्त्यावरून येणाऱया वाहनधारकांनाही कुत्री अंगावर धावून जाण्याचे प्रकारही घडत आहेत. आठ दिवसांपूर्वीच नावगे व जानेवाडी येथील काही दुचाकीस्वारांवर कुत्र्यांनी हल्ला केला होता. यामध्ये दोघे तरुण किरकोळ जखमी झाले होते.

नगरपंचायतींचा दर्जा मिळाला पण…

मच्छे व पिरनवाडी या दोन्ही ग्राम पंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा मिळाला आहे. यामुळे इथल्या निवडणुकासुद्धा झालेल्या नाहीत. नगरपंचायतीचा दर्जा मिळाला आहे, पण कचऱयाची समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष का होते? असे विचारण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका

या भागात नर्सरी, शाळा, कॉलेज अधिक प्रमाणात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची ये-जा अधिक असते. पण कचऱयाच्या ठिकाणी येणाऱया दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याची चिंता पालकवर्गाला अधिक लागून राहिली आहे.

नोडल अधिकाऱयांना दिल्या सूचना : पर्यावरण नियंत्रण बोर्ड

पिरनवाडी व मच्छे येथील कचऱयाच्या समस्येबाबत बेळगाव रामतीर्थनगर, ऑटोनगर येथील पर्यावरण नियंत्रण बोर्डच्या कार्यालयातील मुख्य अधिकारी जगदीश यांना फोनद्वारे संपर्क साधला असता गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वीच मी मच्छे व पिरनवाडीतील कचरा असलेल्या भागाची पाहणी केली व त्यानंतर पिरनवाडी ग्राम पंचायतीच्या नोडल अधिकाऱयांना या परिसरातील कचऱयाची स्वच्छता करा आणि यावर तोडगा काढण्यासाठी सांगितले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

ग्रा. पं.नी योग्य उपाययोजना करावी : सुनील धामणेकर

पिरनवाडीत टाकण्यात येत असलेल्या कचऱयामुळे नागरिकांना रोगराईचा सामना करावा लागत आहे. अलीकडेच बेळगाव-पणजी महामार्गाच्या बाजूला भाजीविक्री करण्यात येत आहे. या महामार्गालगत कचरा टाकण्यात येत आहे. आम्हा स्थानिक नागरिकांसह पिरनवाडीत येणाऱया प्रवाशांनाही दुर्गंधीचा सामना करावा लागतो आहे. या भागातील कचऱयाची समस्या सोडविण्यासाठी मच्छे व पिरनवाडी ग्राम पंचायतींनी योग्य ती उपाययोजना करण्याची गरज आहे.

शेतकऱयांच्या आरोग्याचा प्रशासनाने विचार करावा -विठ्ठल मुचंडीकर

पिरनवाडी नाल्याजवळ भलामोठा कचऱयाचा ढीग साचला आहे. इथल्या कचऱयाची साफसफाईसुद्धा करण्यात येते. मात्र स्वच्छता केल्यानंतर अवघ्या चार-पाच दिवसात पुन्हा कचरा टाकण्यात येतो व परिस्थिती पुन्हा जैसे थे अशी होते. आजूबाजूच्या शेतकऱयांना शिवारात काम करणेही मुश्कील बनले आहे. या शेतकऱयांना दुर्गंधीमुळे फार त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱयांच्या आरोग्याचा विचार प्रशासनाने करावा.

फिरती वाहने-कचराकुंड ठेवा-नागेश शहापूरकर

गेल्यावषी मच्छे व पिरनवाडीतील काही जणांना डेंग्यूची लागण झाली होती. कोरोनामुळे दोन वर्षापासून नागरिक अधिक भयभीत झालेले आहेत. सरकारतर्फे स्वच्छतेविषयी बरीच जागृती केली जाते. मात्र मच्छे व पिरनवाडी परिसरातील कचरा समस्या अद्यापही सुटलेली नाही. कचऱयाची व्यवस्थितरीत्या विल्हेवाट लावण्याची गरज असून आवश्यक असलेल्या ठिकाणी कचराकुंड ठेवले पाहिजेत. तसेच फिरत्या वाहनांचाही विचार करायला हवा.

पर्यावरण नियंत्रण बोर्डाच्या अधिकाऱयांनी भेट देऊन पाहणी करावी- भारत आपटेकर

मच्छे औद्योगिक वसाहत, व्हीटीयु, विविध शाळा, कॉलेज तसेच वेगवेगळय़ा प्रकारची दुकाने यामुळे मच्छे व पिरनवाडी या दोन्ही गावांचा विस्तार झपाटय़ाने वाढत आहे. पण इथल्या कचऱयाच्या समस्येकडे दुर्लक्ष झालेले आहे. पर्यावरण नियंत्रण बोर्डाच्या अधिकाऱयांनी केवळ कार्यालयात बसून न राहता ज्या ठिकाणची परिस्थिती गंभीर आहे, अशा ठिकाणी भेट देऊन पाहणी करावी व मच्छे-पिरनवाडीतल्या कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी धोरणात्मक पावले उचलावीत.

Related Stories

इमारत बांधकाम परवानगी प्रक्रिया सुरळीत

Amit Kulkarni

अस्मिता नाईकची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

Amit Kulkarni

अंगणवाडी कर्मचाऱयांना आर्थिक मदत द्या

Amit Kulkarni

एपीएमसी भाजीमार्केट सील, किरकोळ विक्रीवरही बंदी

Amit Kulkarni

नववर्ष प्रथम दिनी डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये अकरा शिशूंचा जन्म

Patil_p

पावसामुळे हिरवी मिरची झाली लाल, बळीराजा बनला कंगाल

Amit Kulkarni
error: Content is protected !!