तरुण भारत

नवहिंदतर्फे दिनदर्शिका प्रकाशन समारंभ उत्साहात

प्रतिनिधी /बेळगाव

नवहिंद ही दर्जेदार संस्था आहे, हे ऐकून होतो. आज प्रत्यक्ष पाहिले आणि अभिमान वाटला. येळ्ळूरच्या युवकांनी सुरू केलेली पतसंस्था समाजातील गरजूंना पाठबळ देते आणि त्यांचे जीवनमान सुधारते हे दिसून आले, असे गौरवोद्गार नवहिंद को-ऑप. पेडिट सोसायटी लि. या आंतरराज्य संस्थेची 2022 सालची दिनदर्शिका प्रकाशन करताना ऍड. सुधीर चव्हाण यांनी काढले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन उदय जाधव होते.

Advertisements

यावेळी उदय जाधव यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यांनी सांगितले की, सहकाराचे कार्य सतत सुरू ठेवले पाहिजे. त्यामध्ये वैविध्यता असली पाहिजे. त्यासह ग्राहकांशी संवाद साधला पाहिजे. नवहिंद पतसंस्थेने सहकाराच्या माध्यमातून अनेक परिवारांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांचे जीवनमान सुधारले आहे. समाजाच्या उपयोगातील अनेक योजना संस्थेमार्फत सुरू ठेवल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या सभासदांना 2022 सालची दिनदर्शिका मोफत देण्यात येत आहे.

ऍड. सुधीर चव्हाण व अतिथी श्रीधर जाधव यांच्या हस्ते नवहिंद दिनदर्शिका-2022 चे प्रकाशन करण्यात आले. प्रारंभी ऍड. सुधीर चव्हाण व श्रीधर जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन केले.

सूत्रसंचालन अनिल हुंदरे यांनी केले. व्हा. चेअरमन संभाजी कणबरकर व संचालक पी. एस. मुरकुटे, प्रकाश अष्टेकर, अनिल हुंदरे, संचालिका एस. वाय. चौगुले, न्यू नवहिंद मल्टीपर्पजचे चेअरमन दशरथ पाटील, व्हा. चेअरमन नारायण जाधव, नवहिंद प्रियदर्शिनी महिला पतसंस्थेच्या चेअरपर्सन वैशाली मजुकर, व्हा. चेअरपर्सन नम्रता पाटील, नवहिंद महिला प्रबोधन संघाच्या अध्यक्षा शुभांगी पाटील, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, असि. जनरल मॅनेजर एन. डी. वेर्णेकर, शाखाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संचालक प्रकाश अष्टेकर यांनी आभार मानले.

Related Stories

उड्डाणपुलाची निर्मिती शेतकऱयांच्या मुळावर

Amit Kulkarni

युपीएससी परीक्षेसाठी उमेदवारांना एक वर्षाची सवलत द्या

Omkar B

कोरोना नियमांचे पालन करून बी-बियाणांची खरेदी करा

Patil_p

कमकारट्टीजवळ अपघातात मोटार सायकलस्वार ठार

Patil_p

मंजुनाथ इळगेर यांचा सत्कार

Patil_p

म. ए. समिती, श्री एकदंत युवक मंडळाच्या वतीने आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वितरण

Rohan_P
error: Content is protected !!