तरुण भारत

खड्डय़ांमध्ये हरवला जुना धारवाड रोड

शहराचे प्रवेशद्वार असलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष : खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात होताहेत अपघात : दुरुस्तीची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

शहरातील विविध रस्त्यांची दुरवस्था झाली असून शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱया जुना पी. बी. रोडची (बी. एस. येडियुराप्पा मार्ग) वाताहत झाली आहे. रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने वाहनधारकांना वाहने चालविणे कठीण बनले आहे. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात घडत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डय़ांची दुरुस्ती कधी होणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.

जुन्या धारवाड रोडचे सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने रुंदीकरण करण्यात आले आहे. मात्र त्यानंतर रस्त्याच्या देखभालीकडे कानाडोळा झाल्याने जुने बेळगाव कॉर्नर ते लेंढी नाल्यापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे निर्माण झाले असून वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याशेजारी विविध गोडावून, गॅरेज आणि व्यवसाय असल्याने अवजड वाहनांची वाहतूक मोठय़ा प्रमाणात आहे. हा रस्ता वर्दळीचा असल्याने रुंदीकरण करण्यात आले होते. पण रस्त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले आहे. सध्या हा रस्ता खड्डय़ांमुळे वाहनधारकांना धोकादायक बनला आहे. या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे निर्माण झाल्याने अवजड वाहनांसह दुचाकी वाहनधारकांना वाहने चालविणे कठीण बनले आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात काही ठिकाणी अपघात घडत आहेत.

खासबाग ते होसूर कॉर्नरपर्यंच्या रस्त्याचे रुंदीकरण झाले नसल्याने हा रस्ता खूपच खराब झाला आहे. अशातच अलीकडे जलवाहिन्या घालण्यासाठी खोदाई सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुरवस्थेत आणखी भर पडली आहे. धारवाड व बेंगळूर अशा विविध शहरातून बेळगावमध्ये येणारे वाहनधारक या रस्त्याचा अवलंब करीत असतात. शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. पण सध्या या रस्त्याची दैना झाली असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या मार्गावर दररोज अपघात घडत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत असून रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले आहे. सदर रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

एक्सेस इलाईट हुबळी, देसाई वॉरियर्स संघ विजयी

Patil_p

महाविद्यालयांची गुणवत्ता वाढीसाठी ट्रिपल-ए ऑडिटची गरज

Omkar B

आरपीडी-बसवेश्वर चौकातील ट्रफिक सिग्नल सुरू

Patil_p

होमिओपॅथिक संघटनेतर्फे पत्रकारांना औषधाचा डोस

Patil_p

मोहनगा यात्रेला 27 पासून प्रारंभ

Amit Kulkarni

हनुमान नगर येथे मंदिरात चोरी

Patil_p
error: Content is protected !!