तरुण भारत

गोव्याचे राज्यपाल पिलाई यांना प्रबुद्ध भारततर्फे पुस्तक भेट

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगाव येथे प्रबुद्ध भारततर्फे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेमध्ये संस्कृत भारतीतर्फे प्रमुख पाहुणे गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिलाई यांना ‘द प्राईड ऑफ इंडिया’ हे पुस्तक देण्यात आले.

Advertisements

संस्कृत भारती ही स्वयंसेवी संस्था असून संस्कृतच्या प्रचारासाठी आणि विकासासाठी काम करते. या संस्थेत संस्कृतप्रेमी आणि संस्कृत तज्ञांचा सहभाग आहे. 1981 पासून संस्कृत भाषेचे अस्तित्व अबाधित राहणे, तिचा विकास व्हावा या हेतूने ही संस्था कार्यरत आहे. संस्कृत भारतीने संस्कृत भाषेतील दुर्मीळ पुस्तकांचा संग्रह केला आहे. या परिषदेतसुद्धा संस्थेने या पुस्तकांचे प्रदर्शन मांडले होते. राज्यपाल श्रीधरन पिल्लाई यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. संस्कृत भारतीच्या रश्मी कुलकर्णी व मल्लिकार्जुन हळीजोळ्ळे यांनी त्यांना पुस्तक भेट दिले.

Related Stories

खानापूर म. ए. समितीकडून शिवपुतळा विटंबनेचा निषेध

Amit Kulkarni

धामणे (एस) येथे टस्कराचा धुमाकूळ

Patil_p

जिल्हय़ात बर्ड-फ्लूचा शिरकाव रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय

Patil_p

सामाजिक वनिकरण विभागातर्फे रोपलागवडीला प्रारंभ

Amit Kulkarni

जे गेले ते पुन्हा परत येणार नाहीत…!

Patil_p

दत्तक बाळाचे पालकत्व आव्हानात्मक- आनंददायी

Patil_p
error: Content is protected !!