तरुण भारत

छत्रपतींविरोधात व्हल्गना करणाऱयांचा निषेध

शिवप्रतिष्ठान कार्यकर्ते आक्रमक : पुन्हा असे प्रकार घडल्यास जशास तसे प्रत्युत्तर देण्याचा बैठकीत इशारा

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत. परंतु कर्नाटकात त्यांच्याबद्दल वारंवार बदनामीकारक लेखन करण्याचे प्रकार घडत आहेत. बऱयाच ठिकाणी महाराजांच्या पुतळय़ालाही विरोध केला जात आहे. काही विघ्नसंतोषी लोकांमुळे असे प्रकार घडत आहेत. महाराजांची बदनामी करणाऱयांचा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला. तसेच यापुढे असे प्रकार घडल्यास जशास तसे प्रत्युत्तर देवू, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्यावतीने सोमवारी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा प्रमुख किरण गावडे होते. बैठकीत कार्यकर्त्यांनी महाराजांविरोधात लिखाण करणाऱयांचा समाचार घेतला. प्रारंभी शिवचरित्र जगभरात पोहोचविणाऱया शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच वडगाव येथील मनोहर चव्हाण यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.

मोहिमेच्या तयारीला लागा

15 जानेवारीनंतर मोहिमेची तारीख निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे आतापासूनच कार्यकर्त्यांनी मोहिमेच्या तयारीला लागायचे आहे. गावोगावी नवीन कार्यकर्त्यांची फौज तयार करायची आहे. यासाठी विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागांमध्ये बैठका घ्याव्या व कार्यकर्त्यांना मोहिमेविषयी माहिती द्यावी, असे बैठकीत सांगण्यात आले.

सुवर्ण सिंहासन कर्तव्य निधीचे पुन्हा होणार संकलन

संभाजी भिडे गुरुजींच्या प्रेरणेतून स्वराज्याची राजधानी असणाऱया रायगडावर 32 मण सुवर्ण सिंहासन उभारले जाणार आहे. यासाठी बेळगाव परिसरातून मोठय़ा प्रमाणात निधी संकलन केला जात होता. परंतु कोरोनामुळे या निधी संकलनावर निर्बंध आले होते. आता पुन्हा एकदा या उपक्रमाची रुपरेषा आखण्यात आली असून, लवकरच पुन्हा निधी संकलन केले जाणार आहे. सुवर्ण सिंहासनाच्या संरक्षणासाठी खडा पहारा ही योजना आखण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक शिवभक्ताने नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाप्रमुख किरण गावडे यांनी केले.

यावेळी तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील, तालुका प्रमुख परशुराम कोकितकर, विभाग प्रमुख अंकुश केसरकर, किरण बडवाण्णाचे, अनंत चौगुले, गजानन पवार, प्रफुल्ल शिरवलकर, हिरामनी मुचंडीकर, सचिन चोपडे, सिद्धार्थ चौगुले, शुभम पाटील, नेहाल जाधव, आशिष कोचेरी, संदीप पाटील, महेश जांगळे, किशोर लाड यांच्यासह शिवप्रतिष्ठानचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

खानापूर तालुक्यात मुसळधार पाऊस

Patil_p

अत्यावश्यक सेवा वगळता वाहनांना प्रवेशबंदी

Patil_p

मनपाचे कर्मचारी ‘ऑन कोरोना डय़ुटी’

Patil_p

दंडात्मक कारवाईसाठी नको, जबाबदारी ओळखा

Patil_p

टेम्पो-दुचाकी अपघातात भिवशीचा तरुण ठार

Patil_p

शिरीषराव गोगटे यांच्याकडून मास्क व सॅनिटायझरचे वितरण

Patil_p
error: Content is protected !!