तरुण भारत

चिंता वाढली : देशात सर्वाधिक ओमिक्रॉनबाधितांची संख्या महाराष्ट्रात

ऑनलाईन टीम / मुंबई

भारतासह बहुतांशी देशात कोरोना स्थितीत वेगाने बदल घडत असुन यामुळे नागरिकांवरील निर्बंध येत आहे. गेल्या काही दिवसापासुन दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन या व्हेरियंटने वाढणारी रुग्ण संख्या जगाच्या चींतेत भर घालणारी आहे. यामुळे जगातील वेगवेगळ्या भागांमध्ये असणाऱ्या २३ देशांमध्ये मागील दोन दिवसांत कोरोनाच्या नव्या विषाणूने शिरकाव केला आहे. हीच स्थिती महाराष्ट्रात झाली असुन नवीन समोर आलेल्या माहितीनुसार देशात सर्वाधिक ओमिक्रॉनबाधितांची संख्या महाराष्ट्रात असल्याची माहिती समोर आली आहे. पिंपरीतील सहा आणि पुण्यातील एकाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आढळले होते. आता आणखी दोन रुग्णांची भर पडल्याने राज्यातील रुग्णसंख्या १० झाली आहे. तर महाराष्ट्राखालोखाल राजस्थानमध्ये नऊ, कर्नाटकमध्ये दोन तर गुजरातमध्ये ओमिक्रॉनबाधित एक रुग्ण आढळून आलाय. दिल्लीमध्येही ५ डिसेंबर रोजी एक ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोनाच्या उत्परिवर्तित ओमिक्रॉनने सोमवारी देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत शिरकाव केला आहे. मुंबईत ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले असून, राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णसंख्या दहावर पोहोचली आहे. तर देशपातळीवर ही संख्या २३ वर पोहचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशामधील सर्वाधिक ओमिक्रॉन बाधित रुग्ण हे महाराष्ट्रामध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेतून नोव्हेंबरमध्ये मुंबईत आलेल्या ३७ वर्षीय प्रवाशाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या रुग्णाच्या सहवासातील व्यक्तींचा शोध घेतला असता त्याच्याबरोबर राहिलेल्या ३६ वर्षीय मैत्रिणीलाही कोरोनाची लागण झाल्याचे ३० नोव्हेंबरला आढळले होते. ही महिला २५ नोव्हेंबरला अमेरिकेतून मुंबईत आली होती. तिलाही ओमिक्रॉनची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.डोंबिवलीत राज्यातील पहिला ओमिक्रॉन रुग्ण आढळला होता.

Advertisements

त्यामुळे सद्यस्थितीत देशासह महाराष्ट्रात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढत असली तरी संख्या मर्यादीत असेपर्यंत केंद्र आणि राज्यशासन यांनी राजकारणाशिवाय मानवतेवरील संकट समजुन तातडीने उपाययोजनासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. अन्यथा पुन्हा पीएम केअर फंड सारख्या निधीतुन येणारे व्हेंटिलीटर निष्क्रीय निघू लागल्यास कोरोना पुन्हा सामान्यांचे अर्थिक आणि आरोग्यविषयक विळखा घट्ट करेल. आणि परिणामत: सामान्य नागरिक गरिबीच्या खाईत अजुन ढकलला जाईल.

Related Stories

जगभरात 10 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

एअर इंडियाच्या विमानातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा प्रवास, अन्य प्रवाशी 14 दिवसांसाठी क्वारंटाईन

Rohan_P

बिनव्याजी पीककर्ज मर्यादा ३ लाखांवर

Abhijeet Shinde

कोल्हापूर : जुगार अड्यावर छापा, 11 लाख 43 हजाराचा मुद्देमाल जप्त

Abhijeet Shinde

देशात कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढतेय!

Amit Kulkarni

”मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे”

Abhijeet Shinde
error: Content is protected !!