तरुण भारत

सियाचीन ऑक्सिजन प्लांटबाबत सुमेधा चिथडे यांचे व्याख्यान

आरपीडी माहविद्यालयाच्यातर्फे एनसीसी-एनएसएस विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

आरपीडी माहविद्यालयाच्या कला आणि वाणिज्य विभागातर्फे एनसीसी-एनएसएस विद्यार्थ्यांसाठी सियाचीन ऑक्सिजन प्लांटबाबत सुमेधा चिथडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एसकेई सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर,  सोसायटीचे अनेक सदस्य, सैन्यदलात विशेष प्राविण्य मिळविलेले मान्यवर उपस्थित होते. यावेळी 1971 च्या युद्धात सहभागी श्रृंगेरी यांनीही उपस्थिती दर्शविली होती. शृंगेरी दाम्पत्याचा यावेळी सन्मान करण्यात आला.

  रोहिणी व वैष्णवी यांच्या स्वागतगीताने कर्यक्रमची सुरुवात झाली. एनसीसी ऑफिसर प्रा. डॉ. कुरणी यांनी स्वागत केले. विद्यार्थिनी अंजली देशपांडे हिने प्रमुख पहुण्याचा परिचय करून दिला. त्यानंतर अमरज्योत पेटविण्यात आली. महाविद्यालयाच्या प्रचार्या डॉ. शोभा नाईक यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

‘सिर्फ’ च्या सेपेटरी सुमेधा चिथडे, यांनी पी.पी.टी. द्वारा कर्यक्रमाचे सदरीकरण केले. सियाचीनमध्ये जवानांसाठी ऑक्सिजन प्लांट निर्मिती करण्याचा आपला संकल्प आणि तो सिद्धीस नेताना आलेले अनुभव त्यांनी कथन केले.  देशासाठी स्वातंत्र्य मिळविणे येवढेच आपले कर्तव्य नसून त्याप्रती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा आपले कर्तव्य संपले नाही. आपले जवान सीमेवर लढतात, ते आपल्या कामाचा बडेजाव करत नाहीत, पण त्यांचे योगदान शब्दातीत स्वरुपाचे असते असे त्यांनी सांगितले. अनेक उदाहरणे देऊन त्यांनी सैनिकांचे योगदान विद्यार्थ्यांसमोर उलगडले.

त्यांच्या विशेष कमगिरीचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांना एसकेई संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकुर यांनी 1 लाख रुपये साहाय्य निधी अर्पण केला व त्यांचा सत्कार केला. यानंतर एन.एस.एस. ऑफिसर रामकृष्ण यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक तसेच सैन्य दलातील मंडळी उपस्थित होती.

Related Stories

शहरात वाहतूक क्यवस्थेचे तीनतेरा

Patil_p

कर्नाटक: राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या २ लाख पार

Abhijeet Shinde

चेंबर ऑफ कॉमर्सची निवडणूक प्रक्रिया सुरू

Omkar B

यंदाचा गळीत हंगाम एक महिना उशिरा

Amit Kulkarni

कार चोरीप्रकरणी अल्पवयीन मुलांना अटक

Amit Kulkarni

आराम बसच्या दरात विमान प्रवास

Patil_p
error: Content is protected !!