तरुण भारत

जुने बेळगाव नाका परिसरातील दारू दुकाने बंद करा

महिला-नागरिकांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

जुने बेळगाव नाका आणि बी. एस. येडियुराप्पा रोडवर दारू दुकाने मोठय़ा प्रमाणात झाली आहेत. त्यामुळे या परिसरात वारंवार भांडणे, मारामारी होत आहेत. या परिसरातून महिलांना तसेच लहान मुलांना ये-जा करणे अवघड जात आहे. या ठिकाणी बसथांबा आहे. याचबरोबर काही मंदिरेही आहेत. तेव्हा तातडीने या परिसरातील दारू दुकाने बंद करावीत, या मागणीसाठी जुने बेळगाव येथील महिलांसह नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.

जुने बेळगावमधील नागरिकांना ये-जा करण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे. याचबरोबर या रस्त्यावरून इतर गावातील नागरिकदेखील ये-जा करत असतात. या रस्त्यावरच मारुती मंदिर, गणपती मंदिर आहे. तेव्हा त्या ठिकाणी दारू दुकाने ही त्रासाची ठरत आहेत. शाळकरी मुले याचबरोबर महिलांना या परिसरातून ये-जा करणे कठीण झाले आहे. शेतकऱयांना शेताकडे जाणेही अवघड बनले आहे. तेव्हा तातडीने या परिसरातील दारू दुकाने बंद करावीत, अशी मागणी होत
आहे.

दारूबरोबरच अमलीपदार्थांची विक्रीदेखील राजरोसपणे सुरू आहे. शेतामध्ये काही जण जाऊन दारूच्या बाटल्या तसेच प्लास्टिकच्या बाटल्या फेकून देत आहेत. तर काही मद्यपी दारूच्या बाटल्या फोडत आहेत. गांजाचेदेखील सेवन करत आहेत. मद्य तसेच अमलीपदार्थांचे सेवन करून महिला तसेच मुलींची छेडछाड करण्याचे प्रकार वाढले आहेत. तेव्हा ती दुकाने बंद करावीत, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी सोहन खन्नुकर, जितेंद्र चौगुले, प्रवीण देसूरकर, संतोष शिवणगेकर, लक्ष्मीकांत सुतार, सुमित रेडेकर, सतीश खन्नुकर, विक्रम होसूरकर, संदीप पाटील, अमित देसूरकर, महेश पाटील यांच्यासह इतर तरुण व महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.

Related Stories

बाप्पा… पुढच्या वर्षी लवकर या!

Amit Kulkarni

शंभरटक्के घरपट्टी वसुलीसाठी मनपा नियुक्त करणार पथके

Patil_p

सेंट्रल हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांकडून मदत

Patil_p

मोदगा येथील ‘ती’ जमीन मारुती देवस्थानची

Amit Kulkarni

दि ऑर्चर्ड रिसॉर्ट येथे गोवन सीफूड फेस्टिवलला उत्तम प्रतिसाद

Amit Kulkarni

पश्चिम भागात रोप लागवडीस प्रारंभ

Patil_p
error: Content is protected !!