तरुण भारत

बसस्थानकात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव

ये-जा करणाऱया प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण : वाहतुकीला अडथळा, मनपाचे दुर्लक्ष

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

शहरात भटक्मया कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. बसस्थानक परिसरात भटक्मया कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने प्रवाशांसह वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. भटक्मया कुत्र्यांना पकडण्यात मनपा अपयशी ठरत असल्याने या कुत्र्यांचा उच्छाद वाढला आहे. मनपा प्रशासनाने कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

भटक्मया कुत्र्यांचे नागरी वस्तीबरोबर बसस्थानक परिसरात प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ये-जा करणाऱया प्रवाशांमध्ये भीती निर्माण होत आहे. कुत्र्यांचा कळप सातत्याने बसस्थानकात फिरत असल्याने प्रवाशांना ये-जा करणेही कठीण झाले आहे. बसस्थानक परिसरात असलेल्या हॉटेल, कचराकुंडी व मुख्य रस्त्यावर कुत्र्यांची दहशत वाढली आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्नही निर्माण होत आहे. काहीवेळेला ही कुत्री प्रवाशांवर धावून जाण्याचाही प्रयत्न करतात. त्यामुळे प्रवाशांना भीतीच्या छायेखालीच रहावे लागत आहे. यापूर्वी भटक्मया कुत्र्यांनी अनेकांचा चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र अशा कुत्र्यांना पकडण्याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

बसस्थानक परिसरात असलेले फेरीवाले, व्यावसायिक टाकाऊ पदार्थ रस्त्याशेजारी टाकतात. त्यामुळे कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. उघडय़ावरच पदार्थ टाकले जात असल्याने त्यावर ताव मारण्यासाठी कुत्र्यांचा कळप तुटून पडतो. अशा भटक्मया कुत्र्यांना पकडण्याची मोहीम गतिमान करावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

जळगावमध्ये 12 वऱहाडींचा मृत्यू

Patil_p

माधवबागची ‘हृदयरोग मुक्त कर्नाटक’ मोहीम आजपासून

Patil_p

ऑक्सिजन-व्हेंटिलेटर बेडचा तुटवडा त्रासदायक

Patil_p

आयसीएमआरच्या कर्मचाऱयाला कोरोनाची बाधा

Patil_p

मनपातील आणखी एका अधिकाऱयाला कोरोनाची लागण

Patil_p

ऊस पिकाला आला तुरा, शेतकऱयांची तोडणीसाठी लगबग

Patil_p
error: Content is protected !!