तरुण भारत

राष्ट्रीयत्वाची भावना महाराष्ट्राच्या नसानसांत – राष्ट्रपती

ऑनलाईन टीम / रायगड

रयतेच्या सार्वभौम स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थिती लावली. हा कार्यक्रम ६ डिसेंबर रोजी किल्ले रायगडवर पार पडला.
यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रीयत्वाची भावना महाराष्ट्राच्या नसानसांत असुन राष्ट्रीय भावना आणि अन्यायाविरोधात संघर्ष करण्याचे साहस ही महाराष्ट्राच्या नसानसांत भिनलेले आहे. १९ व्या शतकात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि महादेव गोविंद रानडे यांनी ज्या समाजसुधारणेला सुरुवात केली. असे गौरवोद्गार किल्ले रायगडावर काढले.

यावेळी राष्ट्रपती कोविंद यांना छत्रपती शिवरायांच्या पट्टा या शस्त्राची, मराठा धोप व सुवर्ण होणाची प्रतिकृती तसेच आज्ञापत्रातील एक उतारा भेट म्हणून देण्यात आला. यावर राष्ट्रपती कोविंद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापरातील वस्तूंच्या या प्रतिकृती माझ्यासाठी वंदनीय व प्रेरणादायी आहेत. या सर्व भेटवस्तू राष्ट्रपती भवनातील संग्रहालयात सन्मानपूर्वक ठेवण्यात येतील,असे यावेळी सांगितले.

Advertisements

हा कार्यक्रम रायगड विकास प्राधिकरण, भारतीय पुरातत्त्व खाते, रायगड जिल्हा प्रशासनाचे सर्व विभाग व अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती यांच्या प्रयत्नातुन पार पडला. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, स्वातीजी कोविंद,संभाजीराजे छत्रपती, युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती, महाराजकुमारमालोजीराजे छत्रपती, युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती व पालकमंत्री आदिती तटकरे आदि मान्यवर ही यावेळी उपस्थित होते.

Related Stories

शिरोळ शहरात पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला

Abhijeet Shinde

तिरुपती बालाजी दर्शन ऑनलाईन बुकिंग करताय ! जरा थांबा आधी ही बातमी वाचा

Sumit Tambekar

दिल्लीतील कृषीभवन सील, एका अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा

Rohan_P

तालुका, जिल्हा इस्पितळांमध्ये ‘सीसीटीव्ही’ची नजर

Patil_p

सिंघू बॉर्डर खाली करा, तरुणाच्या हत्येनंतर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

Abhijeet Shinde

आज राज्यात १८७ नवीन रुग्णा; एकूण रुग्णसंख्या १७६१

Abhijeet Shinde
error: Content is protected !!