तरुण भारत

साहेब नाहीत, नंतर या!

अधिकारी निवडणूक, अधिवेशनाच्या तयारीत मग्न

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

विधानपरिषद निवडणूक व हिवाळी अधिवेशन यामुळे सरकारी अधिकारी कामात गुंतले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना शासकीय कागदपत्रांसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. महानगरपालिका, उपनोंदणी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, अन्न व नागरी पुरवठा खाते, जिल्हाधिकारी कार्यालय यासह इतर शासकीय कार्यालयांतील बहुतांशी अधिकाऱयांना निवडणूक आणि अधिवेशनाच्या कामाला जुंपण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची शासकीय कामे रेंगाळत आहेत.

लॉकडाऊनमुळे मागील दोन वर्षांपासून शासकीय कार्यालयांची कामे विस्कळीत झाली आहेत. मध्यंतरी बरीच शासकीय कार्यालये बंद होती. त्यामुळे नागरिकांची कामे थांबली होती. अनलॉकनंतर कार्यालये सुरळीत सुरू झाली असली तरी आता निवडणूक आणि हिवाळी अधिवेशनामुळे अधिकारी जाग्यावर नाहीत. त्यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या पायऱया झिजवाव्या लागत आहेत. 10 डिसेंबर रोजी विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे तर 13 डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी निवडणूक आणि अधिवेशनाच्या तयारीला लागले आहेत.

अवकाळी पावसामुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाईसाठी धडपड सुरू आहे. मात्र शासकीय अधिकारी जाग्यावर नसल्याने शेतकऱयांना कागदपत्रे मिळणे कठीण झाले आहे. याबरोबरच इतर शासकीय कागदपत्रेदेखील आवश्यक असतात. मात्र अधिकारी वेळेत उपलब्ध होत नसल्याने शासकीय कागदपत्रांविना नागरिकांना माघारी परतावे लागत आहे. सर्रास कारभार ऑनलाईन पद्धतीने सुरू असला तरी कागदपत्रांवर अधिकाऱयांची सही आवश्यक असते.

Related Stories

चाकूच्या धाकाने कारचालकाची लूट

Amit Kulkarni

मराठी 20 वे बालसाहित्य संमेलन 27 फेब्रुवारीला

Amit Kulkarni

आप्पाचीवाडीच्या विकासासाठी कटिबद्ध

Patil_p

जोयडा तहसीलदार संजय कांबळे यांच्याकडून चांदवाडी ब्रिजची पाहणी

Patil_p

जीएसएस कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

Patil_p

रानडे रोड येथील ड्रेनेज वाहिनीची अखेर दुरुस्ती

Omkar B
error: Content is protected !!