तरुण भारत

चोरटय़ांनी केले मंदिरांना लक्ष्य

पांगुळगल्ली अश्वत्थामा मंदिरात चोरी, परिसरात भितीचे वातावरण

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

गेल्या चार दिवसांपूर्वी खडेबाजार बेळगाव येथील अंबाबाई मंदिरातील चोरीची घटना ताजी असतानाच आज पांगुळगल्ली येथील अश्वत्थामा मंदिरात चोरी झाल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.

मंगळवारी सकाळी मंदिर स्वच्छ करण्यासाठी महिला आली होती. तिने मंदिरासमोरचा परिसर स्वच्छ केला. त्यानंतर गाभाऱयाचा दरवाजा उघडून पाठीमागच्या बाजूला असलेल्या मारूती मंदिराची स्वच्छता करत असताना केवळ दहा मिनिटात अश्वत्थामा मूर्तीवरील मुखवटा चोरटय़ाने लांबविला आहे.

तीन किलो चांदीचा हा मुखवटा तीन किलो वजनाचा होता असे सांगण्यात आले. या घटनेची मार्केट पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

आर. ए. लाईन मंदिरजवळील रस्ता खुला करा

Amit Kulkarni

नियमित अन् वाढीव वेतन द्या

Amit Kulkarni

शेततळय़ात पडून 4 बालकांचा मृत्यू

Patil_p

बेनकनहळ्ळी येथे भरदिवसा घरफोडी

Patil_p

तर राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा : डी.के.शिवकुमार

Abhijeet Shinde

डॉ. कोडकिणी आय सेंटरमध्ये नवीन साधनांचा उद्घाटन समारंभ

Amit Kulkarni
error: Content is protected !!