तरुण भारत

इराणचे भय, आखाती देशांच्या दौऱयावर सौदी युवराज

अरब देशांमधील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न

वृत्तसंस्था / रियाध

Advertisements

अमेरिका, इस्रायल, युरोप आणि आखाती देशांना इराणकडून अण्वस्त्रनिर्मिती होण्याची भीती सतावत आहे. याचमुळे आखातातील सर्वात शक्तिशाली देश सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान अरब देशांना इराणविरोधात एकजूट करण्याच्या मोहिमेवर निघाले आहेत. ओमान, संयुक्त अरब अमिरात, कतार आणि कुवैतचा सलमान दौरा करणार आहेत. पहिल्या टप्प्यात ते ओमानमध्ये पोहोचतील. पाश्चिमात्य देश इराणसोबत आण्विक करारावर विचार करत असल्याने सलमान यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरतो. इस्रायल आणि आखाती देश या कराराच्या विरोधात आहेत.

आखाती आणि विशेषकरून अरब देशांमध्ये मागील काही दिवसांमध्ये अचानकपणे राजनयिक हालचाली वेगमान झाल्या आहेत. अलिकडेच तुर्कस्तानचे अध्यक्ष रिसेप तैयप एर्दोगान यांनी कतारचा दौरा केला होता. त्यापूर्वी संयुक्त अरब अमिरातच्या वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱयांनी इराणचा दौरा केला होता. पुढील महिन्यात गल्फ को-ऑपरेशन कौन्सिलची बैठक होणार असल्यानेच सलमान याप्रकरणी आखाती देशांच्या दौऱयावर गेले असल्याचे सौदी अरेबियाच्या काही अधिकाऱयांचे सांगणे आहे.

अलिकडच्या काही वर्षांमध्ये सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात व्यापार आणि विदेश धोरणाच्या मुद्दय़ावरून मतभेद वाढले आहेत. बहारीन, कुवैत आणि कतारप्रकरणीही हेच म्हटले जाऊ शकते. आखाती देशांना एकजूट करण्याची सलमान यांची इच्छा आहे.

आखाती देशांमध्ये मतभेद का?

मुस्लीम आणि आखाती देशांमध्ये सौदी अरेबियासारखा प्रभावशाली देश अन्य कुठलाच नाही तसेच त्याच्या प्रभुत्वाला क्षेत्रात आव्हान दिले जाऊ शकत नाही. तरीही बहारीन, कतार आणि संयुक्त अरब अमिरात कुठल्या न कुठल्या स्वरुपात सौदी अरेबियासाठी आव्हान निर्माण करत आहेत. सर्व आखाती देशांसाठी इराण मोठे आव्हान असल्याने किमान या बाबतीत तर आखाती देशांनी एकजूट रहावे असे सलमान यांचे म्हणणे आहे. तर काही सूत्रांनुसार सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातने इराणशी थेट चर्चा देखील केली आहे.

अमेरिकन फॅक्टर

जो बायडेन हे जानेवारीमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यावर समीकरणे बदलली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणे बायडेन हे आखाती देशांना प्राधान्य देत नसल्याचे संकेत आहेत. याचमुळे युवराज सलमान स्वतःच्या सहकाऱयांसोबतचे संबंध सुधारू पाहत आहेत. अमेरिकेच्या विदेश धोरणात सध्या चीन आणि रशियाशी स्पर्धेला महत्त्व मिळाले आहे. रशिया आणि चीन यासारख्या दोन मोठय़ा शक्तींचा सामना करता यावा म्हणूनच अफगाणिस्तानातून अमेरिकेने सैन्य मागे घेतल्याचे मानले जाते.

स्थिती बदलतेय

सैदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात किंवा पूर्ण अरब जगतात अद्याप देखील अमेरिकाच सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार आहे. तरीही या क्षेत्रातील देश फ्रान्स, रशिया आणि चीनच्या दिशेने सरकू लागले आहेत. हे देश स्वतःच्या क्षेत्रात संरक्षण उद्योग निर्माण करू पाहत आहेत. संयुक्त अरब अमिरात, बहारीन आणि इस्रायल, सौदी अरेबियाने 2015 मधील अमेरिका-इराण कराराला विरोध केला होता. तर ट्रम्प यांनी हा करारच रद्द केला होता.

Related Stories

पाकमध्ये क्रिकेट सामन्यावर दहशतवाद्यांकडून गोळीबार

datta jadhav

ऑईल रिफायनरीमध्ये इंडोनेशियात मोठी आग

Patil_p

युरोपातील 27 देशात कोरोनाचा वेगाने प्रसार

datta jadhav

अफगाणिस्तान संघर्षात 34 जणांचा मृत्यू

Omkar B

मोदी सत्तेत आल्यापासून देशातील स्वातंत्र्य कमी झाले : ‘ग्लोबल फ्रीडम’चा अहवाल

Rohan_P

5 पट अधिक डोस दिल्याने तब्येत बिघडली

Patil_p
error: Content is protected !!