तरुण भारत

77 वर्षीय इसमावर जडले 20 वर्षीय युवतीचे प्रेम

ऑनलाईन झाले प्रेम, आता विवाहाची करतेय प्रतीक्षा

प्रसिद्ध गायक जगजीत सिंह यांचे एक प्रसिद्ध गाणे आहे, ज्यातील एक ओळ प्रेमाची व्याख्या समजाविते, ‘ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन, जब प्यार करे कोई तो देखे केवल मन’. ही ओळ प्रेमात वय, अंतर किंवा धर्म-समुदाय यासारख्या गोष्टी महत्त्वाच्या नसल्याचे दर्शविते. असेच काहीसे म्यानमारमधील एका 20 वर्षीय युवतीसोबत घडत आहे. तिचे मन 77 वर्षीय इसमावर जडले असून तो हजारो मैल अंतरावर राहतो.

Advertisements

म्यानमारमध्ये राहणारी 20 वर्षीय जो विद्यार्थिनी असून तिचा प्रियकर 77 वर्षीय डेव्हिड  इंग्लंडमध्ये म्युझिक प्रॉडय़ुसर आहे. दोघेही 18 महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. म्यानमारमधील स्थिती आणि कोरोना महामारीमुळे दोघेही परस्परांपासून दूर राहतात.

डेटिंग साइटवर भेट

जो आणि डेव्हिड यांची भेट एका डेटिंग साइटवर 18 महिन्यांपूर्वी झाली, जो एखाद्या मार्गदर्शकाच्या शोधात होती, जो तिला साथ देण्यासह शिक्षणात आर्थिक स्वरुपात मदत करेल. तर डेव्हिड फ्लर्टिंगच्या उद्देशाने साइटवर असायचे. मी नेहमीच स्वतःला मनाने तरुणच समजत होतो असे डेव्हिड सांगतात.

लवकरच करणार विवाह

दोघांनीही आता विवाह करण्याचा निश्चय केला आहे. जो चा पासपोर्ट तयार होताच आणि व्हिसा मिळताच ती डेव्हिड यांना भेटण्यासाठी ब्रिटनमध्ये पोहोचणार आहे. तेथेच दोघेही विवाह करणार आहेत. दोघांनीही परस्परांना अत्यंत काळजी घेणारे आणि मदतीस तत्पर ठरविले आहे.

Related Stories

सर्वात मोठे नाक असणारा व्यक्ती

Patil_p

84 वर्षीय आजीने उडविले विमान

Patil_p

गुगलकडून ‘कोरोना वॉरियर्स’ साठी खास डुडल

prashant_c

डूडलच्या माध्यमातून गुगलचा ज्येष्ठ अभिनेत्री जोहरा सेहगल यांना सलाम!

Rohan_P

सदाबहार गीतांनी उलगडला संगीताचा सुवर्णकाळ

prashant_c

भारतीय वायुदलाचा 88 वा स्थापना दिवस : अभिमानास्पद गगनभरारी

Rohan_P
error: Content is protected !!