तरुण भारत

टेस्लाची भारतात विक्रीसाठी सबसिडीची मागणी

सबसिडीच्या प्रश्नावरुन अनेक ग्राहक टेस्ला कारच्या प्रतीक्षेत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

भारतीय बाजारात एलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी सध्या कर आकारणीच्या प्रश्नावरून झगडते आहे. सलगपणे सरकारकडे कंपनी इलेक्ट्रिक कारवर सबसिडी मिळण्याची मागणी करत आहे. मागणीबाबत विचार होत नसल्यानेच टेस्लाचे लाँचिंग लांबणीवर पडत आहे. देशात टेस्लाच्या कारवर सबसिडी मिळण्याची मागणी केली आहे परंतु अमेरिकेत मस्क यांनी सबसिडीला विरोध केला आहे.

भारतात बेंगळुरात ऑफिसदेखील कंपनीने सुरू केले असून अद्यापही कारबाबत कोणत्याच हालचाली नसल्याबाबत चर्चा होताना दिसते आहे. भारतामध्ये टेस्ला कंपनीला सबसिडी मिळाली नसल्यामुळे कारच्या सादरीकरणाला उशिर होत असल्याची माहिती आहे. कारण भारतीय बाजारात सध्या विदेशी इलेक्ट्रिक कारवर 60 ते 100 टक्के कर घेतला जात आहे.  देशामध्ये सध्या 30 लाख रुपयापर्यंत किमतीच्या इलेक्ट्रिक कारवर 60 टक्के कर लागू होत आहे. तसेच किमती जर अधिक असल्यास 100 टक्के कर घेतला जातो.

सरकारकडे पाठपुरावा

मस्क यांनी वेळोवेळी भारत सरकारकडे कार निर्मितीसाठी विचारणा केली आहे. त्याचा पाठपुरावा केला आहे. सबसिडीची मागणी पूर्ण करण्याची अपेक्षा कंपनी बाळगून आहे.

अमेरिकेत सबसिडी नको- मस्क

युएसमध्ये तयार होणाऱया इलेक्ट्रिक वाहनांवर जादा 3.40 लाख रुपयाची कर सवलत देण्यासाठीचे बिल तयार केले जात आहे. याला मस्क यांनी विरोध केला आहे. अमेरिकेत टेस्ला आणि विदेशी कंपन्यांच्या संघटना तेथील कारखान्यांमध्ये नसल्याचेही मस्क यांनी म्हटले आहे. त्यामुळे बिल मंजूर होऊ नये, अशी आपली अपेक्षा आहे.

Related Stories

बँकिंगच्या समभाग विक्रीमुळे बाजारात घसरण

Patil_p

ऑनलाइन फार्मसी कंपन्यांचा व्यवसाय तेजीत

Amit Kulkarni

कच्च्या तेलाची आयात घसरली

Patil_p

या कंपन्यांसाठी जीएसटी ई-बिल सक्तीचे?

Omkar B

कोरोना काळात स्मार्टफोन कंपन्यांचा उत्पादन वाढीवर भर

Patil_p

महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 16 इलेक्ट्रिक वाहने सादर करणार

Patil_p
error: Content is protected !!