तरुण भारत

चंद्रावर पोहोचू शकतो पहिला भारतीय

न्यूयॉर्क

अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने स्वतःच्या चांद्रमोहिमेसाठी 10 प्रशिक्षणार्थी अंतराळवीरांची निवड केली आहे. या अंतराळवीरांना भारतीय वंशाचे अनिल मेनन देखील सामील आहेत. 45 वर्षीय अनिल नासाच्या क्लास 2021 चा हिस्सा होणार आहेत. या क्लाससाठी निवडण्यात आलेल्या 10 जणांमध्ये 6 पुरुष आणि 4 महिला आहेत. नासा 50 वर्षांनी चंद्रावर माणूस पाठविण्याच्या प्रकल्पावर काम करत आहे. अनिल मेनन हे अमेरिकेच्या वायुदलात लेफ्टनंट कर्नल असून स्पेसएक्समध्ये फ्लाइट सर्जन देखील राहिले आहेत.

Advertisements

अनिल मेनन यांनी भारतात एक वर्षे वास्तव्य देखील केले आहे. चंद्रावर आतापर्यंत भारताचा कुठलाच अंतराळवीर गेलेला नाही. परंतु आतापर्यंत भारताचे 3 लोक अंतराळात जाऊन आले आहेत. यात भारतीय वंशाच्या कल्पना चावला, सुनीता विलियम्स आणि राजा चारी यांचा समावेश आहे. मेनन यांचे वडिल भारतीय तर आई युक्रेनियन आहे.

Related Stories

ह्युस्टनच्या पोस्ट कार्यालयाला शीख अधिकाऱयाचे नाव

Patil_p

तैवानमध्ये रेल्वे अपघातात 36 ठार, 72 जखमी

datta jadhav

130 फूट उंच खडकावर 1200 वर्षे जुने चर्च

Patil_p

युरोपीय महासंघाचे स्वतःचे सैन्य असणार

Patil_p

म्यानमारमध्ये आंग सान सू की यांना 4 वर्षांची शिक्षा

Patil_p

काश्मीप्रकरणी अजरबैजानचे विखारी फुत्कार

Patil_p
error: Content is protected !!