तरुण भारत

दक्षिण आफ्रिका अ चा पहिला डाव 268 धावांत समाप्त

वृत्तसंस्था/ ब्लोमफाऊंटन

येथे सुरू असलेल्या तिसऱया अनधिकृत कसोटीत दक्षिण आफ्रिका अ संघाच्या पहिल्या डावातील 268 धावसंख्येला प्रत्युत्तर देताना भारत अ संघाने मंगळवारी खेळाच्या दुसऱया दिवशी शेवटची बातमी हाती आली त्यावेळी 4 बाद 109 धावा जमविल्या होत्या. दक्षिण आफ्रिका अ संघाच्या पहिल्या डावात इर्वे, झोंडो आणि झोरेझी यांनी अर्धशतके झळकविली. भारत अ संघातील दीपक चहरने 4 तर नवदीप सैनीने 3 गडी बाद केले.

Advertisements

दक्षिण आफ्रिका अ संघाने 7 बाद 249 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांचे शेवटची तीन गडी 19 धावांची भर घालत तंबूत परतले. त्यांच्या डावात सलामीच्या इर्वेने 8 चौकारांसह 75, झोरेझीने 8 चौकारांसह 58, झोंडोने 8 चौकारांसह 54, क्वेशिलेने 2 चौकारांसह 22 धावा केल्या. इर्वे आणि झोरेझी यांनी तिसऱया गडय़ासाठी 111 धावांची भागिदारी केली. भारत अ संघातर्फे दीपक चहरने 45 धावांत 4 तर सैनीने 51 धावांत 3 आणि सौरभकुमारने 52 धावांत 2 गडी बाद केले.

भारत अ संघाने पहिल्या डावात शेवटची बातमी हाती आली त्यावेळी 39 षटकांत 4 बाद 109 धावा जमविल्या. पृथ्वी शॉ 5 धावांवर बाद झाला. ईश्वरनने 5 चौकारांसह 28, देवदत्त पडिक्कलने 1 चौकारांसह 8, सर्फराज खान 2 चौकारांसह 14 धावा जमविल्या. कर्णधार हनुमा विहारी 4 चौकारांसह 33 तर इशान किशन 2 चौकारांसह 9 धावांवर खेळत होते. दक्षिण आफ्रिका अ संघातर्फे जेनसेन, सिपम्ला, प्रेटोरियस आणि मुथुसामी यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला आहे.

संक्षिप्त धावफलक ः दक्षिण आफ्रिका अ प. डाव सर्वबाद 268 (इर्वे 75, झोरेझी 58. झोंडो 56, क्वेशिले 22, दीपक चहर 4-45, सैनी 3-51, सौरभकुमार 2-52), भारत अ प. डाव- 39 षटकांत 4 बाद 109 (शॉ 5, ईश्वरन 28, पडिक्कल 8, सर्फराज खान 14, हनुमा विहारी खेळत आहे 33, इशान किशन खेळत आहे. 9).

धावफलक अपूर्ण

Related Stories

युकी भांब्रीचे आव्हान समाप्त

Amit Kulkarni

विजयी मालिकेसाठी मुंबई एफसी सज्ज

Patil_p

सिनसिनॅटी स्पर्धेत व्हेरेव्ह, बार्टी विजेते

Patil_p

क्रिकेटपटू चेतन साकारियाला पितृशोक

Patil_p

तिन्ही क्रिकेट प्रकारात नेतृत्वाची धुरा विराटकडेच!

Patil_p

झगडणाऱ्या केकेआरला पंजाबचे आव्हान पेलवणार का?

Patil_p
error: Content is protected !!