तरुण भारत

बांगलादेशची पहिल्या डावात घसरगुंडी

वृत्तसंस्था/ ढाका

येथे सुरू असलेल्या दुसऱया आणि शेवटच्या कसोटीतील मंगळवारी खेळाच्या चौथ्या दिवशी साजिद खानच्या फिरकी गोलंदाजीसमोर यजमान बांगलादेशची पहिल्या डावात घसरगुंडी झाली. दिवसअखेर बांगलादेशने पहिल्या डावात 26 षटकांत 7 बाद 76 धावा जमविल्या. पाकच्या साजीद खानने 35 धावांत 6 गडी बाद केले. तत्पूर्वी पाकने आपला पहिला डाव 4 बाद 300 धावांवर घोषित केला होता. या कसोटीत पावसाळी वातावरणामुळे बराच खेळ वाया गेल्याने दोन्ही संघांचा पहिला डावही अद्याप पूर्ण होऊ शकलेला नाही.

Advertisements

 पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या सामन्यातील खेळाच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये केवळ 63.2 षटकांचा खेळ झाला. पाकने 2 बाद 188 या धावसंख्येवरून चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. आणि 4 बाद 300 धावांवर डावाची घोषणा केली. कर्णधार बाबर आझमने 9 चौकारांसह 76, अझहर अलीने 8 चौकारांसह 56, फवाद आलमने 7 चौकारांसह नाबाद 50, मोहम्मद रिझवानने 4 चौकारांसह नाबाद 53, अबीद अलीने 6 चौकारांसह 39, शफीकने 2 चौकारांसह 25 धावा जमविल्या. फवाद आलम आणि मोहम्मद रिझवान यांनी पाचव्या गडय़ासाठी अभेद्य 103 धावांची भागिदारी केली. अझहर अली आणि बाबर आझम यांनी तिसऱया गडय़ासाठी 123 धावांची भर घातली. बांगलादेशतर्फे तैजुल इस्लामने 2 तर हुसेन आणि खलीद अहमद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

  बांगलादेशच्या पहिल्या डावाला तिसऱया षटकापासून गळती लागली. साजीद खानच्या फिरकीसमोर बांगलादेशचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. नजमुल हुसेनने 3 चौकारांसह 30 धावा जमविल्या. शकीब अल हसन 3 चौकारांसह 23 धावांवर खेळत आहे. बांगलादेशच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. अंधूक प्रकाशामुळे चौथ्या दिवशीचा खेळ थांबला त्यावेळी बांगलादेशने पहिल्या डावात 26 षटकांत 7 बाद 76 धावा जमविल्या होत्या. साजीद खानने 35 धावांत 6 गडी बाद केले. डावात 5 गडी बाद करण्याची साजीद खानची ही पहिली वेळ आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकने पहिली कसोटी जिंकून बांगलादेशवर आघाडी मिळविली आहे. बांगलादेशचा संघ अद्याप 224 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे तीन गडी खेळावयाचे आहेत. या कसोटीतील खेळाचा शेवटचा दिवस बाकी आहे.   संक्षिप्त धावफलक ः पाक प. डाव 4 बाद 300 डाव घोषित (अबीद अली 39, शफीक 25, अझहर अली 56, बाबर आझम 76, फवाद आलम नाबाद 50, मोहम्मद रिझवान नाबाद 53, टी. इस्लाम 2-73, हुसेन 1-88, खलीद अहमद 1-49), बांगलादेश प. डाव 26 षटकांत 7 बाद 76 (नजमुल हुसेन 30, शकीब अल हसन खेळत आहे 23, साजीद खान 6-35).

Related Stories

इंग्लंडचा जेसॉन रॉय टी-20 मालिकेतून बाहेर

Patil_p

इंग्लंडचा सर्वात मोठा विजय

Patil_p

ऑलिम्पिक स्पर्धा प्रेक्षकांशिवाय घेण्याचा विचार

Patil_p

स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींचे ‘हे’ विशेष ‘१२७’ अतिथी लावणार उपस्थिती

Abhijeet Shinde

टी-20 मालिकेतील तिसरा सामना आज

Patil_p

टी-20 वर्ल्ड कपसाठी पुढील आठवडय़ात संघनिवड

Patil_p
error: Content is protected !!