तरुण भारत

अभिषेक सैनीला एकेरीचे जेतेपद

वृत्तसंस्था/ ढाका

रविवारी येथे झालेल्या बांगलादेश आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा बॅडमिंटनपटू अभिषेक सैनीने पुरूष एकेरीचे जेतेपद पटकाविताना आपल्याच देशाच्या रुत्विक संजीवीचा अंतिम सामन्यात पराभव केला.

Advertisements

अंतिम फेरीतील सामन्यात अभिषेक सैनीने संजीवीचा 34 मिनिटाच्या कालावधीत 21-15, 21-18 असा पराभव करत एकेरीचे जेतेपद पटकाविले. या स्पर्धेत सैनीने उपांत्य सामन्यात भारताच्या कार्तिकीय गुलशनकुमारचा 17-21, 21-15, 21-15 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. महिलांच्या दुहेरीचे जेतेपद भारताच्या मेहरीन रिझा आणि आरती सुनील यांनी पटकाविताना मलेशियाच्या कस्तुरी राधाकृष्णन व विनोशा राधाकृष्णन यांचा 22-20, 21-12 असा पराभव केला.

Related Stories

जेटलीची निवड बिनविरोध होण्याची शक्यता

Patil_p

विदर्भ क्रिकेट संघटनेकडून पंचांचे मानधन थकित

Patil_p

श्रीनगर येथील राष्ट्रीय आईस स्टॉक स्पर्धेत कोल्हापूरच्या यशने पटकावले कांस्यपदक

Abhijeet Shinde

आतंरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचा शिल्पकार हरपला

Patil_p

दिल्ली बुल्स अंतिम फेरीत दाखल

Patil_p

राष्ट्रकुल हॉकीतून भारताची माघार

Patil_p
error: Content is protected !!