तरुण भारत

आशियाई युवा पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला 16 पदके

वृत्तसंस्था/ मनामा, बहरीन

येथे झालेल्या आशियाई युवा पॅरा क्रीडा स्पर्धेत भारताच्या पॅरा बॅडमिंटन संघाने 16 पदके पटकावत भरघोस यश मिळविले. पलक कोहली, संजना कुमारी व हार्दिक मक्कर यांनी प्रत्येकी तीन पदके पटकावली.

Advertisements

भारताच्या पॅरा बॅडमिंटन संघाने मिळविलेल्या पदकांत 4 सुवर्ण, 7 रौप्य व 5 कांस्यपदकांचा समावेश आहे. सुवर्ण मिळविणाऱया खेळाडूंत नित्या श्री (डब्ल्यूएस एसएच 6), संजना कुमारी (डब्ल्यूएस  एसएल 3), पलक कोहली-संजना कुमारी (डब्ल्यूडी एसएल 3-एसयू 5), नेहा गुप्ता-अभिजीत शखुजा (एमडी एसएल 3-एसएल 4) यांचा समावेश आहे. रौप्य मिळविणाऱया खेळाडूंत नित्या श्री-आदित्य कुलकर्णी (एक्सडी एसएच 6), ज्योती (डब्ल्यूएस एसएल 4), नवीन एस. (एमएस एसएल 4), हार्दिक मक्कर (एमएस एसयू 5), करण-रुतिक (एमडी एसयू 5), हार्दिक-संजना (एक्सडी एसएल 3-एसयू 5), ज्योती (डब्ल्यूडी एसएल 3-एसयू 5) यांचा समावेश आहे. पलक कोहली (डब्ल्यूएस एसयू 5), पलक कोहली-नेहल गुप्ता (एक्सडी एसएल 3-एसयू 5), नवीन एस.-हार्दिक मक्कर (एमडी एसयू 5), आदित्य कुलकर्णी (एमएस एसएच 6), संथिया (डब्ल्यूएस एसएल 3-एसयू 5) यांनी कांस्यपदके मिळविली.

चौथी आशियाई युवा पॅरा क्रीडा स्पर्धा ही बहरीनमध्ये आयोजित करण्यात आलेली पहिलीच मोठी पॅरा स्पर्धा आहे. 2 ते 6 डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडली. त्यात 30 देशांतील 23 वर्षाखालील वयोगटामधील 750 क्रीडापटूंनी भाग घेतला होता. पॅरा ऍथलेटिक्स, पॅरा बॅडमिंटन, बोक्सिया, गोलबॉल, पॅरा पॉवरलिफ्टिंग, पॅरा जलतरण, पॅरा टेबल टेनिस, पॅरा तायक्वांदो, व्हीलचेअर बास्केटबॉल असे नऊ क्रीडा प्रकार त्यात घेण्यात आले होते.

Related Stories

मायदेशातील मालिकेसाठी बीसीसीआयची बैठक

Patil_p

बांगलादेश मंडळाकडून क्रिकेटपटूंचा आरोप फेटाळला

Patil_p

शिखर धवनचे 57 चेंडूत झंझावाती शतक

Patil_p

द.आफ्रिका 29 धावांनी आघाडीवर, डुसेन, मार्करमची अर्धशतके

Amit Kulkarni

धवनचा ‘डॅडी कूल’ डान्स

Patil_p

लोवलिनाला ऐतिहासिक कांस्य

Patil_p
error: Content is protected !!