तरुण भारत

केन विल्यम्सन दोन महिने क्रिकेटपासून अलिप्त

वृत्तसंस्था/ वेलिंग्टन

न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यम्सन याला गेल्या दोन महिन्यापासून कोपरा स्नायु दुखापतीची समस्या चांगलीच भेडसावत आहे. या दुखापतीवर तो आता वैद्यकीय उपचार करवून घेणार असल्याने तो किमान दोन महिने क्रिकेटपासून अलिप्त राहील, अशी माहिती न्यूझीलंड संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी दिली आहे.

Advertisements

जानेवारी महिन्यात न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका न्यूझीलंडमध्ये खेळविली जाणार आहे. या मालिकेसाठी विल्यम्सन उपलब्ध राहू शकणार नाही. भारताविरूद्धच्या मुंबईत झालेल्या दुसऱया कसोटीवेळी विल्यम्सनला संघाबाहेर असूनही या दुखापतीच्या वारंवार वेदना जाणवत होत्या. येत्या फेब्रुवारी-मार्च दरम्यान होणाऱया दक्षिण आफ्रिका बरोबरच्या कसोटी मालिकेसाठी विल्यम्सन तंदुरूस्त होईल, अशी आशा प्रशिक्षक स्टीड यांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

न्यूझीलंड महिला संघाच्या कर्णधारपदी सोफी डेव्हाईन

Patil_p

स्टीपलचेसमधील केनियन वर्चस्व संपुष्टात

Patil_p

फुटबॉलपटू फाँड्रे मुंबई सिटी क्लबशी करारबद्ध

Patil_p

अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतून बेन्सिकची माघार

Patil_p

रूमानियाचे तीन वेटलिफ्टर्स अपात्र

Patil_p

पंजाबची घोडदौड आज राजस्थान रॉयल्स रोखणार?

Patil_p
error: Content is protected !!