तरुण भारत

गुंगीचा स्प्रे मारून भ्याड चोरी

उंब्रजला राज्यमार्गालगतच्या बंगल्यातील घटना; 1 लाख 80 हजाराचा ऐवज लंपास

प्रतिनिधी/ उंब्रज

Advertisements

पाटण-पंढरपूर राज्यमार्गावर हजारे मळा येथील बंगला चोरटय़ांनी फोडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरवाजाच्या तीन कडय़ा कटावणीने तोडून चोरटय़ांनी झोपेत असणाऱया सात जणांच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारुन ही धाडसी चोरी केली असून सुमारे 1 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. मंगळवार 7 डिसेंबर रोजी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

   याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, उंब्रज येथील राज्यमार्गावर हजारे मळा येथे प्रशांत राजाराम टंकसाळे यांचा राजलता बंगला आहे. टंकसाळे यांच्या बंगल्याच्या मुख्य दरवाजाला तीन कडय़ा आहेत. या कडय़ा सहजासहजी तोडणे कठीण आहे. मात्र मंगळवारी पहाटे अज्ञात चोरटय़ांनी मुख्य दरवाजाच्या कडय़ा व कोयंडा कटावणीने उचकटून घरात प्रवेश केला. घरातील झोपलेल्या सात सदस्यांच्या नाका, तोडावर गुंगीचा स्प्रे मारुन बंगल्यातील एका खोलीत असणाऱया लोखंडी कपाटातील ड्रॉव्हर उचकटला. या ड्रॉव्हरमधील 3 तोळे सोन्याच्या वजनाची मोहनमाळ, अर्ध्या तोळ्याची सोन्याची अंगठी, चांदीचा छल्ला यासह रोख रक्कम असा मिळून सुमारे 1 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरटय़ांनी गुंगी येण्यासारखा स्प्रे मारला असल्याचे टंकसाळे कुटुंबीयांनी सांगितले. त्यामुळे सकाळपर्यत त्यांना नाकातोंडात व डोळ्यात जळजळल्याचे जाणवले. आजूबाजूला असणाऱया कुत्र्यांना देखील गुंगीचा स्प्रे मारल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. चोरटय़ांनी चोरी करुन बंगल्याची बाहेरून कडी लावून पोबारा केला. सकाळी सदर घटनेची माहिती उंब्रज पोलिसांना मिळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर ठिकाणचा पंचनामा केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकानेही तपासणी केली.

 दरम्यान उंब्रज येथे गेल्या काही दिवसांत चोऱयांचे प्रमाण वाढले आहे. मात्र मंगळवारी पहाटे झालेल्या धाडसी चोरीने भीतीचे वातावरण निर्माण झाले असून  पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

Related Stories

अक्षय मोहितेची महाराष्ट्र केसरीसाठी निवड

Amit Kulkarni

फाशीचा वड स्मारकास विद्रोहींकडून अभिवादन

datta jadhav

सातारा : जिल्ह्यात लॉकडाऊन वाढला

Patil_p

हे राज्य लोकशाहीचे नाही तर ठोकशाहीचे; तुम्हाला सत्तेसाठी निवडून दिले नव्हते

Abhijeet Shinde

उदयनराजे यांनी घेतली राज्यसभेची शपथ

Patil_p

सातारा : स्वच्छतेसाठी यशस्वी पाठपुरावा

datta jadhav
error: Content is protected !!