तरुण भारत

जिल्हा पोलीस दलात 95 टक्के लसीकरण पूर्ण

प्रतिनिधी/ सातारा

जिल्हा पोलीस दलात कोरोना लसीचे दोन्ही डोस 95 टक्के अधिकारी व कर्मचाऱयांनी घेतले आहेत. 5 टक्के गर्भवती, गंभीर आजाराने ग्रस्त असणाऱया पोलीसांनी घेतलेली नाही. सध्यस्थितीत कोरोनाची लागण झालेले 5 पोलीस उपचार घेत आहेत.

Advertisements

कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने लागू करण्यात आलेल्या लॉडाऊनमध्ये नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशाचे पालन करण्यासाठी पोलीसांचा मोठा फौज फाटा तैनात होता. कोरोनाच्या भीतीपेक्षा नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून पोलीस रस्त्यावर उतरले होते. या काळात अनेक पोलीसांना कोरोनाची लागण झाली. तर अनेकांनी कोरोनावर मात केली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देण्यात येणारी लस ही पोलीस कर्मचाऱयांना घेणे ही बंधनकारक आहे. जिल्हा पोलीस दलात महिला व पुरूष असे मिळून 2 हजार 950 पेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी 95 टक्के कर्मचाऱयांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. ज्या महिला पोलीस गर्भवती आहेत. काही पोलीस कर्मचारी गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. त्यांनी लस घेतलेली नाही. सध्यस्थितीत एक अधिकारी आणि चार कर्मचारी यांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

Related Stories

सिव्हीलमधील मंदिरात कार्तिकी एकादशी कार्यक्रम

Omkar B

मंत्री मुश्रीफांचा घोटाळा बाहेर काढला म्हणून माझ्या अटकेचे आदेश; किरीट सोमय्यांचा आरोप

Abhijeet Shinde

सातारा : अकरा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह, अठरा जण विलगीकरण कक्षात दाखल

Abhijeet Shinde

कोरोनाचा नवीन ओमायक्रॉन व्हेरियंटला नागरिकांनी घाबरु नये

Patil_p

महाराष्ट्र : मागील 24 तासात 69 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

सातारा : नागठाणे येथे युवतीची आत्महत्या

Abhijeet Shinde
error: Content is protected !!