तरुण भारत

केंद्राकडे गोडोली-शिवराज पेट्रोल पंप रस्त्यासाठी दहा कोटींचा प्रस्ताव

प्रतिनिधी/ सातारा

शिवराज पेट्रोल पंपापासून गोडोलीकडे येणारा मार्ग हा सातारा शहरात कोल्हापूरकडून प्रवेश करण्याचा महत्वाचा मार्ग आहे. शहराच्या आसपासच्या पर्यटनाच्या दृष्टीने शहराला अनन्यसाधारण महत्व आहे. हे महत्व आणि गरज विचारात घेवनू, सीआरएफ फंडामधून गोडोली ते शिवराज पेट्रोल पंप अखेरचा रस्ता चार पदरी करणे आणि सुधारणे या कामासाठी रुपये 10 कोटींचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचेकडे पाठविला आहे. लवकरच या रस्त्याला सीआरएफमधून मंजूर मिळेल, अशी माहीती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली.

Advertisements

लिंबखिंड ते खिंडवाडी या राष्ट्रीय महामार्ग सातारा शहरातून जातो. या रस्त्याच्या दर्जोन्नतीसाठी गेल्या दोन वर्षापासून सातत्याने निधी उपलब्ध करुन घेतला आहे. या रस्त्यापैकी मोळाचा ओढा ते करंजे व्हाया एसटी स्टॅन्ड ते गोडोली शिवराज पेट्रोल पंप या रस्त्यापैकी मोळाचा ओढा ते गोडोली अखेरच्या रस्त्याची दर्जोन्नती करण्यात आलेली आहे.

गोडोली नाका ते शिवराज पेट्रोल पंपाचा भाग गतवर्षी नगरपरिषदेच्या हद्दीत समाविष्ट झालेला आहे. या रस्त्यावर राज्य परिवहन विभागाच्या गाडय़ासह, व्यावसायिक वाहनांचा आणि खासगी वाहनांची मोठय़ा प्रमाणावर वाहतूक सुरु असते. शहराजवळील कास पठार, ठोसेघर आणि भांबवली धबधबा, सज्जनगड, महाबळेश्वर, क्षेत्र महाबळेश्वर या पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी अनेक बहिस्थ वाहनांची नेहमीच वर्दळ या रस्त्यावरुन असते. युवाकार्यकर्ते संग्राम बर्गे आणि विलासपूरच्या उदयनराजे मित्रसमुहाच्या कार्यकर्त्यांकडून सदरचा रस्ता रुंदीकरण व सुधारणा होणेकरीता पाठपुरावा होत आहे.  या सर्व बाबीचा विचार करुन, सुरक्षित वाहतुकीसाठी गोडोली ते शिवराज पंप अखेर सुमारे 1400 मिटरच्या रस्त्याचे चौपदरीकरण करणेचे काम सन 2022-23 च्या केंद्रीय मार्ग निधीमधून प्रस्तावित केले आहे. यामध्ये रस्त्याचे चौपदरीकरण, दुभाजक, आरसीसी गटर, फुटपाथ, विद्युतीकरण आदी कामांचा समावेश आहे.

 देशाचे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचेकडे या विकासकामाचा सीआरएफमध्ये समावेश होणेबाबत रितसर प्रस्ताव पाठवून मागणी करण्यात आलेली आहे. लवकरच या रस्त्याकरीता सीआरएफमधून निधी उपलब्ध होईल आणि या कामाची पुढील कार्यवाही सुरु होईल, अशी माहीती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

Related Stories

सातारा जिल्ह्यात 322 जण कोरोनामुक्त, 682 जणांचे नमुने तपासणीला

Abhijeet Shinde

खांबाटकीत वाहतूक संथ गतीने

Patil_p

सोनगाव कचरा डेपोची आग आटोक्यात

Patil_p

महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांनी माफी मागावी : गृहमंत्री

Rohan_P

महाराष्ट्रात ‘ब्लॅक फंगस’ रुग्णांची संख्या 8,646 वर

Rohan_P

कृष्णा हॉस्पिटलमधून आणखी 9 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज

Patil_p
error: Content is protected !!