तरुण भारत

बसपास वितरण प्रक्रिया अंतिम टप्प्यात

31 हजार विद्यार्थ्यांना बसपास वितरित

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

मागील दोन-तीन महिन्यांपासून हाती घेण्यात आलेल्या ऑनलाईन बसपास वितरण प्रक्रियेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आतापर्यंत 31,600 विद्यार्थ्यांना बसपास वितरित करण्यात आले असून शिल्लक विद्यार्थ्यांनादेखील बसपास वितरित केले जात आहेत. आतापर्यंत बसपासच्या माध्यमातून परिवहनकडे 2 कोटी 62 लाखाचा महसूल जमा झाला आहे.

गतवर्षापासून ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना बसपास मिळविण्यासाठी नाहक त्रास सहन करावे लागत आहेत. त्यामुळे गतवषीच्या तुलनेत यंदा बसपास मिळविणाऱया विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. दरवषी बेळगाव विभागातील 76 हजारहून अधिक विद्यार्थी बसपासच्या माध्यमातून प्रवास करतात. मात्र यंदा उशिराने सुरू झालेल्या शाळा-कॉलेजमुळे बसपास वितरण प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. दरवषी शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला की बसपास वितरण प्रक्रियेला सुरुवात व्हायची. मात्र कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून बसपास वितरण प्रक्रियाही विस्कळीत झाली आहे. शाळांना उशिराने प्रारंभ झाल्याने बसपास वितरण प्रक्रियेलादेखील उशिराने प्रारंभ झाला. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी बसपास घेण्याकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. दरवषी विद्यार्थ्यांच्या बसपासच्या माध्यमातून परिवहनला कोटय़वधीचा महसूल मिळतो. मात्र यंदा बसपास घेणाऱया विद्यार्थ्यांची संख्याही घटली आहे.

Related Stories

काळय़ा नदीवरील झुलत्या पुलाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Omkar B

आज बाल साहित्याचा जागर

Amit Kulkarni

हिरेहट्टीहोळीतील पूरग्रस्तांचे ठिय्या आंदोलन

Omkar B

निजामुद्दीन कार्यक्रमाला जिल्हय़ातूनही हजेरी

Patil_p

जिमखाना विद्यार्थी परिषदेचे जीएसएस कॉलेजमध्ये उद्घाटन

Amit Kulkarni

भाजीपाल्याच्या दरात घट

Patil_p
error: Content is protected !!