तरुण भारत

कपिलेश्वर उड्डाणपुलावर वाहतुकीची प्रचंड कोंडी

दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबचलांब रांगा : तानाजी गल्ली रेल्वेगेट परिसरातही चक्काजाम

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

आठवडय़ाचा पहिलाच दिवस वाहनचालकांना डोकेदुखीचा ठरला. सोमवारी सायंकाळी कपिलेश्वर उड्डाणपुलावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहनचालक तासन्तास या वाहतूक कोंडीत अडकून पडले. केवळ कपिलेश्वर उड्डाणपूलच नव्हे तर महाद्वार रोड, तानाजी गल्ली रेल्वेगेट येथेही वाहने अडकून पडली होती. इतकी प्रचंड वाहतूक कोंडी होऊनदेखील रहदारी पोलीस नसल्याने वाहनचालक संताप व्यक्त करत होते.

कपिलेश्वर उड्डाणपुलावर सोमवारी वाहनचालकांना ट्रफिक जामचा सामना करावा लागला. शहरातून शहापूरच्या दिशेने जाणाऱया वाहनचालकांना गर्दीमुळे पाटील गल्लीमार्गे जावे लागले. परंतु देशपांडे पेट्रोलपंपपासून तानाजी गल्ली रेल्वेगेटपर्यंत वाहतूक कोंडी झाल्याने पुन्हा माघारी फिरत जिजामाता चौकातून शहापूरच्या दिशेने जावे लागले.

फोर्ट रोड तसेच पाटील गल्लीत वाहने रस्त्यावर लावल्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. परंतु या वाहतूक कोंडीमुळे नोकरदारांना घरी जाण्यासाठी तासभराची मेहनत घ्यावी लागली.

रहदारी पोलिसांची नेमणूक करा

एरव्ही वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिसांची फौज उभी असते. परंतु ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते, त्याठिकाणी पोलीसच नसतो. याचा प्रत्यय सोमवारी पुन्हा एकदा आला. कपिलेश्वर उड्डाणपूल व तानाजी रेल्वेगेट येथे वाहतूक कोंडी होऊनही पोलीस नसल्याने वाहनचालक संतप्त झाले होते. गर्दीच्या ठिकाणी तरी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी केली जात
होती.

Related Stories

कृपा करून आमच्या मुलांची सुटका करा

Amit Kulkarni

कोरोनाबाबत दुर्लक्ष करू नका

Patil_p

रविवार पेठ पुन्हा बंद ठेवण्याची सूचना

Patil_p

आयटीआय प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा ओढा

Amit Kulkarni

नुकसानग्रस्त बटाटा उत्पादकांकडे दुर्लक्ष

Patil_p

जीमवरील निर्बंधामुळे शरीरसौष्ठवपटू नैराश्याच्या गर्तेत

Amit Kulkarni
error: Content is protected !!